Box Office Collection- रिलीजच्या 13 दिवसांमध्येच 200 कोटींच्या क्लबमध्ये गेला ‘कबीर सिंग’

Box Office Collection- रिलीजच्या 13 दिवसांमध्येच 200 कोटींच्या क्लबमध्ये गेला ‘कबीर सिंग’

सिनेमा प्रदर्शित होऊन दोन आठवडे झाले असले तरी याच्या गल्ल्यात तसूभरही फरक पडलेला नाही.

  • Share this:

मुंबई, 04 जुलै- शाहिद कपूरचा कबीर सिंग सिनेमा सध्या बॉक्स ऑफिसवर दमदार कामगिरी करत आहे. सिनेमा प्रदर्शित होऊन दोन आठवडे झाले असले तरी याच्या गल्ल्यात तसूभरही फरक पडलेला नाही. सिनेमाने अवघ्या १३ दिवसांमध्ये 206 कोटींचा गल्ला कमावला आहे. बॉक्स ऑफिसवर २०० हून जास्तची कमाई करणारा हा शाहिदचा पहिला सोलो सिनेमा आहे. याआधी मल्टीस्टारर पद्मावत सिनेमाने 275 कोटींची कमाई केली होती. मात्र कबीर सिंगमध्ये शाहिदने एकट्याच्या जीवावर ही कमाई केली आहे. कबीर सिंग सिनेमाने प्रदर्शनाच्या १३ व्या दिवशी ७.५३ कोटींची कमाई केली. आतापर्यंत या सिनेमाने २००.४८ कोटींची कमाई केली आहे.

एवढंच नाही तर या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर सलमान खानच्या रेकॉर्डडलाही मागे टाकले आहे. सलमानच्या भारत सिनेमाने १४ दिवसांमध्ये २०० कोटींची कमाई केली होती. तर उरीः द सर्जिकल स्टाइकला २०० कोटींच्या क्लबमध्ये जायला २८ दिवस लागले होते.

Video- Rahul Gandhi नी राजीनामा दिल्यानंतर पाहिला आयुष्मानचा Article 15 सिनेमा

 

View this post on Instagram

 

Your love is so overwhelming words will always fall short. Thank you for understanding him forgiving him and loving him with all your heart. We all fall apart. And we all must strive to rise from our faults. To be better. To be wiser. To be kinder. He is flawed. So are we all. You didn’t judge him you experienced him. You understood him. I have never ever felt so thankful. The most flawed character I have ever played. Has become my most loved. Indeed indian cinema and the audience has come a long way. More power to brave choices. More power to you all for your maturity and humanness. You have given me wings to fly. To not only be burdened by the need to be loved to be a star but to have the courage to be hated in equal measure to be an actor. Here’s to cinema mirroring life. To protagonists who don’t have to be restricted by their goodness and can be human and imperfect. There is perfection in imperfection and that is the beauty and the challenge of this human life. Thank you. Again and again. You all are the heroes of this story.

A post shared by Shahid Kapoor (@shahidkapoor) on

शाहिद कपूरने मानले चाहत्यांचे आभार-

शाहिदने त्याच्या इन्स्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर करत चाहत्यांनी दिलेल्या पाठिंब्याबद्दल आभार मानले. या व्हिडिओमध्ये सिनेमाच्या फोटोंना मिळून शाहिदचं पोट्रे बनताना दिसत आहे. या व्हिडिओला कॅप्शन देताना शाहिदने लिहिले की, ‘तुम्हा सर्वांचं प्रेम अपरंपार आहे. कबीर सिंगच्या चुकांना माफ करून त्याला इतकं प्रेम दिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे आभार.’

कबीर सिंग सिनेमाने फार कमी काळात २०० कोटींच्या क्लबमध्येच प्रवेश मिळवला नाही. तर याआधी १०० कोटींच्या क्लबमध्ये सर्वात कमी वेळात प्रवेश मिळवणारा हा सिनेमा ठरला होता. केसरी सिनेमाने आठ दिवसांमध्ये १०५. ८६ कोटी कमावले होते. तर एवढ्याच दिवसांमध्ये गली बॉयने १००. ३० कोटी कमावले होते. तर टोटल धमाल या सिनेमाने सात दिवसांमध्ये ९४. ५५ कोटी रुपयांची कमाई केली होती. या सगळ्यांना मागे टाकत कबीर सिंगने सहा दिवसांमध्ये १२० कोटी रुपये कमावले होते.

Bigg Boss Marathi 2- सई असेल दुसरी वाइल्ड कार्ड एण्ट्री?

SPECIAL REPORT: अभिनेत्री भाग्यश्री दासानीच्या पतीला मुंबई पोलिसांकडून अटक

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jul 4, 2019 07:25 PM IST

ताज्या बातम्या