मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /शाहिद कपूरच्या चाहत्यांसाठी बॅड न्यूज, 'Jersey' सिनेमा रिलीजबाबत निर्मात्यांनी घेतला हा निर्णय

शाहिद कपूरच्या चाहत्यांसाठी बॅड न्यूज, 'Jersey' सिनेमा रिलीजबाबत निर्मात्यांनी घेतला हा निर्णय

शाहिद कपूरचा आगामी सिनेमा ‘जर्सी’ (Shahid Kapoor Jersey) कधी प्रदर्शित होणार याची प्रेक्षकांना अतुरता लागली आहे. हा सिनेम 31 डिसेंबरला प्रदर्शित होणार होता. मात्र आता या सिनेमाची रिलीज डेट पुढे ढकलण्यात आली आहे.

मुंबई, 28 डिसेंबर - शाहिद कपूरचा आगामी सिनेमा ‘जर्सी’ (Shahid Kapoor Jersey) कधी प्रदर्शित होणार याची प्रेक्षकांना अतुरता लागली आहे. हा सिनेम 31 डिसेंबरला प्रदर्शित होणार होता. मात्र आता या सिनेमाची रिलीज डेट पुढे ढकलण्यात आली आहे. निर्माते या सिनेमाची रिलीज डेट लवकरच जाहीर करणार आहेत. यासंबंधीची माहिती चित्रपट समीक्षक तरण आदर्श यांनी ट्वीटरवर दिली आहे. शाहिद कपूरच्या चाहत्यांसाठी ही बातमी काहीसी शॉकिंग आहे. निर्मात्यांनी असं का केलं याबद्दल कोणतीच माहिती अद्याप समोर आलेली नाही.

तरण आदर्शने असेही म्हटले आहे की, चित्रपट थेट OTT वर प्रदर्शित करणार असल्याची बातमी पूर्णपणे चुकीची आहे. तरण आदर्शने ट्विट करून लिहिले आहे की, 'एक्सक्लुझिव्ह..ब्रेकिंग न्यूज..जर्सी पोस्पोंड..चित्रपट 31 डिसेंबरला रिलीज होणार नाही. चित्रपट रिलीजची नवीन तारीख लवकरच जाहीर केली जाईल. चित्रपट थेट OTT वर प्रदर्शित करणे चुकीचे आहे. आता चित्रपट रसिकांना निर्मात्यांच्या नवीन तारखेच्या घोषणेची प्रतीक्षा करावी लागणार आहे.

वाचा-शहनाजचा डान्स video पाहून आसीमने मारला टोमणा, फॅन्स म्हणाले असं काही...

या सिनेमासाठी शाहिदने खूप मेहनत घेतली आहे. त्याला एका मुलाखतीत विचारण्यात आले होते की, हा सिनेमा करताना ज्याला कोणत्या दोन भारतीय क्रिकेटरपासून प्रेरणा मिळाली. शाहिदने 'जर्सी' मधील त्याच्या व्यक्तिरेखेबद्दल बॉलिवूड हंगामाला दिलेल्या मुलाखतीत सांगितले होती की, "महेंद्रसिंह धोनी (MS Dhoni) आणि विराट कोहलीच्या (Virat Kohli) व्यक्तिमत्त्वाने मी प्ररित झालो. एक चांगला 'फलंदाज याहीपेक्षा त्यांचे व्यक्तिमत्त्व मला नेहमी आकर्षित करते. त्यांच्यापासून मला प्रेरणा मिळते.

Shahid Kapoor movie jersey will not be released on 31st dec now

या चित्रपटात शाहिद एका 36 वर्षीय क्रिकेटरची भूमिका साकारत आहे. जो केवळ मुलाची इच्छा पूर्ण करण्यासाठी खेळाकडे परत वळतो. यापूर्वी हा चित्रपट या वर्षाच्या सुरुवातीला रिलीज होणार होता. पण कोरोनामुळे उशीर झाला आणि आता निर्मात्यांना रिलीजची तारीख पुढे ढकलावी लागली आहे.

First published:
top videos

    Tags: Bollywood News, Entertainment, Shahid kapoor