शाहीद कपूर जखमी, क्रिकेट खेळताना लागला बॉल, पडले 13 टाके

शाहीद कपूर जखमी, क्रिकेट खेळताना लागला बॉल, पडले 13 टाके

दुपारनंतर शाहीदचं क्रिकेट खेळतानाचं शुटींग होतं. शॉट देण्यासाठी तो पिचवर आला. काही बॉल त्याने खेळले आणि एक बॉल उसळी घेऊन थेट त्याच्या डोक्यावरच आदळला

  • Share this:

चंदीगड 10 जानेवारी : बॉलिवूड अभिनेता शाहीद कपूर शुटींग सुरू असताना आज जखमी झालाय. शाहीदच्या जर्सी या चित्रपटाचं सध्या पंजाबची राजधानी चंदीगडमध्ये शुटींग सुरू आहे. या शुटींगदरम्यान तो क्रिकेट खेळत होता. त्याचवेळी एक जोरदार बॉल त्याच्या डोक्याला लागला. त्यात तो जखमी झाला. शाहीदला लगेच हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलंय. जखम खोल असल्याने त्याला 13 टाके पडले आहेत. त्याची प्रकृती आता सुधारत असल्याचं डॉक्टरांनी म्हटलंय.

आज दुपारपर्यंत सगळं काही व्यवस्थित सुरू होतं. दुपारनंतर शाहीदचं क्रिकेट खेळतानाचं शुटींग होतं. शॉट देण्यासाठी तो पिचवर आला. काही बॉल त्याने खेळले आणि एक बॉल उसळी घेऊन थेट त्याच्या डोक्यावरच आदळला अशी माहिती Pinkvilla या वेबसाईटने दिली आहे.

घटनेची माहिती कळताच शाहीदची बायको मीरा चंदीगडला पोहोचली. या अपघातामुळे जर्सीचं शुटींग काही दिवसांसाठी थांबविण्यात आलंय. डॉक्टरांनी त्याला पूर्ण आराम करण्याचा सल्ला दिलाय. मात्र आठवडाभर आराम करून शाहीद पुन्हा शुटींगसाठी येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिलीय. डिसेंबर महिन्यापासून त्याने जर्सीच्या शुटींगला सुरुवात केली होती.

View this post on Instagram

#jersey #prep

A post shared by Shahid Kapoor (@shahidkapoor) on

Published by: Ajay Kautikwar
First published: January 10, 2020, 10:05 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading