...म्हणून प्रत्येक सिनेमामध्ये शाहिद कपूर बदलतो त्याची हेअर स्टाइल

...म्हणून प्रत्येक सिनेमामध्ये शाहिद कपूर बदलतो त्याची हेअर स्टाइल

कपिल शर्मा शोमध्ये शाहिदनं ते प्रत्येक सिनेमामध्ये तो वेगवेगळ्या हेअरस्टाइलमध्ये का दिसतो याचा खुलासा केला.

  • Share this:

मुंबई, 17 जून : बॉलिवूड अभिनेता शाहिद कपूर सध्या त्याचा आगामी सिनेमा ‘कबीर सिंग’च्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. या सिनेमात शाहिद एका अशा नशेत राहणाऱ्या डॉक्टरची भूमिका साकारत आहे. सिनेमाच्या प्रमोशनसाठी शाहिद आणि कियारानं नुकतीच कपिल शर्मा शोमध्ये हजेरी लावली. यावेळी या दोघांनीही त्यांच्या आयुष्याविषयी अनेक खुलासे केले. यासोबतच कपिल शर्माच्या सेटवर खूप मस्तीही केली. यावेळी शाहिदनं ते प्रत्येक सिनेमामध्ये तो वेगवेगळ्या हेअरस्टाइलमध्ये का दिसतो याचा खुलासा केला.

View this post on Instagram

 

She was his addiction, his obsession, and his love. #KabirSingh Link in bio... . . @kiaraaliaadvani @sandeepreddy.vanga @its_bhushankumar @muradkhetani #KrishanKumar @ashwinvarde @santha_dop @filmykothari @tseries.official @kabirsinghmovie @cine1studios

A post shared by Shahid Kapoor (@shahidkapoor) on

‘कबीर सिंग’ सिनेमाच्या प्रमोशनसाठी ‘द कपिल शर्मा शो’मध्ये पोहोचलेल्या शाहिदला कपिलनं प्रत्येक सिनेमातील त्याच्या हेअरस्टाइल विषयी प्रश्न विचारला यावर उत्तर देताना शाहिद म्हणाला, 'एकदा माझे वडील पंकज कपूर मला म्हणाले होते की तू प्रत्येक सिनेमामध्ये तुझ्या लुकवर एक्सपेरिमेंट करायला हवेस. त्यामुळे मी माझ्या लुक सोबतच माझ्या हेअर स्टाइलवरही वेगवेगळे प्रयोग करत असतो'.

काही दिवसांपूर्वी या सिनेमातील गाण्याच्या लाँचवेळी  शाहिदनं कियाराच्या रिलेशनशिप स्टेटसविषयी खुलासा केला होता. या कार्यक्रमा दरम्यान शाहिदला त्याच्या कॉलेज लाइफमधील रोमान्स बद्दल विचारण्यात आलं. त्यावर शाहिद म्हणाला, 'आता माझं लग्न झालंय त्यामुळे मी रिटायर्ड झालो आहे. मात्र माझी मैत्रिण कियारा अजूनही सिंगल आहे. त्यामुळे तिला हा प्रश्न विचारला जाऊ शकतो'. कियारा म्हणाली, 'मी सिंगल आहे, जेव्हा मी शाळेत होते तेव्हा मला प्रेमात पडावं असं वाटलं होतं पण असं काहीही झालं नाही'.

View this post on Instagram

 

A post shared by KIARA (@kiaraaliaadvani) on

'कबीर सिंह' हा सिनेमा अर्जुन रेड्डी या तेलुगू सिनेमाचा हिंदी रिमेक आहे. तेलुगू सिनेमामधील अभिनेता विजय देवराकोंडानं केलेली भूमिका हिंदीमध्ये शाहिद कपूर साकारत आहे. शाहिद एका अशा डॉक्टरची भूमिका साकारत आहे, जो सतत दारूच्या नशेत राहतो आणि त्याला आपल्या रागावर नियंत्रण ठेवता येत नाही. या सिनेमात कियारा अडवाणी आणि शाहिद कपूर प्रमुख भूमिकेत आहेत.

SPECIAL REPORT : लाखोंच्या चिल्लरने उडवली शिर्डीच्या साई संस्थानाची झोप

First published: June 17, 2019, 6:27 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading