मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /

Mira Shahid Kapoor : 58 करोडच्या नव्या घरात दिवाळी साजरी करणार शाहिद कपूर अन् मीरा; डिटेल्स वाचून थक्क व्हाल

Mira Shahid Kapoor : 58 करोडच्या नव्या घरात दिवाळी साजरी करणार शाहिद कपूर अन् मीरा; डिटेल्स वाचून थक्क व्हाल

Shahid Kapoor and mira rajput

Shahid Kapoor and mira rajput

तब्बल 58 करोड रुपयांना शाहिद आणि मीरानं नवं घर खरेदी केलं आहे. अभिनेत्याच्या घराचे डिटेल्स जाणून घ्या.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India
  • Published by:  Minal Gurav

मुंबई, 29 सप्टेंबर : अभिनेता शाहिद कपूर नेहमीच त्याच्या चाहत्यांसाठी आनंदाची बातमी घेऊन येत असतो. यंदाची दिवाळी त्याच्यासाठी फार खास असणार आहे.  कारण पत्नी आणि मुलांसह शाहिद नव्या घरात दिवाळी साजरी करणार आहे.  मीरा आणि शाहिद जुहूच्या सी फेसिंग अपार्टमेंटमधून वरळीला शिफ्ट होणार आहेत. शाहिद मीराने वांद्रे वरळी सी लिंक जवळ नवीन आलिशान घर खरेदी केलं आहे. खरंतर हे घर त्यांनी 2018मध्येच खरेदी केलं होतं पण घराचे मालकी हक्क त्यांना 2019मध्ये मिळाले. ज्यानंतर आता त्यांना त्या घरी शिफ्ट होण्याचा निर्णय घेतला आहे. तब्बल 58 करोड रुपयांना शाहिद आणि मीरानं नवं घर खरेदी केलं आहे.

शाहिदनं हे घर 2018मध्ये खरेदी केलं. तेव्हाच तो घरी शिफ्ट होणार पण दरम्यान आलेल्या कोरोनाच्या संकटामुळे निर्णय मागे घेतला. पिंकविलानं दिलेल्या माहितीनुसार, पाच दिवसांआधीच शाहिर त्याच्या कुटुंबाबरोबर नव्या घरी शिफ्ट झाला आहे. जुन्या घराप्रमाणेच नवीन घरही सुंदर समुद्रासमोर आहे. शाहिद आणि मीरानं घरात गृहप्रवेश करताच छोटी पुजा केली ज्याला घरातील जवळची माणसं उपस्थित होती.

हेही वाचा - Ranbir Kapoor: रणबीरने सेलिब्रेट केला लग्नानंतरचा फर्स्ट बर्थडे; आलियाने दिली जंगी पार्टी

कोरोनामुळे तर शाहिदला नव्या घरी शिफ्ट होण्यासाठी वेळ लागलाच मात्र घराच्या इंटिरीययर डेकोरेशनचं कामही बाकी होतं. शाहिद का लग्झरी कार आणि बाईकचा शॉकिन आहे हे सर्वांनाच माहिती आहे. त्यामुळे या सगळ्यासाठी शाहिदनं 360 वेस्टमध्ये 6 पार्किंग स्लॉटही विकत घेतले आहेत.

शाहिदकडे XKR-S, रेंज रोवर वॉग कार, मर्सिडिज AMG S-400सारख्या लग्झरी कार आहेत. त्याचप्रमाणे याचवर्षी शाहिदनं 3 करोडची मेबॅक कारही खरेदी केली आहे. एवढ्या महागड्या गाड्या ठेवण्यासाठी शाहिदनं 6 पार्किंग स्लॉट खरेदी केलेत.

कसं आहे शाहिदचं नवं घर?

शाहिदला बाल्कनीत बसायला प्रचंड आवडतं. शाहिदच्या नव्या घराचा बाल्कनी एरिया प्रचंड मोठा आहे. फक्त 500 स्केअर फूटची बाल्कनी आहे अशी माहिती समर आली आहे. अपार्टमेंट 42 आणि 43 एकत्र करुन शाहिदनं एक घर बनवलं आहे.  त्याचप्रमाणे मुलांच्या सेफ्टीसाठी शाहिद आणि मीरानं नव्या घरात शिफ्ट होण्याचा निर्णय घेतला.

First published:

Tags: Bollywood, Bollywood actor, Bollywood News