11 वर्षानंतर बॉलिवूडची 'ही' प्रसिद्ध जोडी पुन्हा एकत्र!

11 वर्षानंतर बॉलिवूडची 'ही' प्रसिद्ध जोडी पुन्हा एकत्र!

1 वर्षांनंतर गीत आणि आदित्य म्हणजेच आपल्या सगळ्यांची लाडकी करिना कपूर खान आणि शाहिद कपूर पुन्हा एकदा मोठ्या पडद्यावर एकत्र दिसणार आहेत.

  • Share this:

29 जानेवारी : 11 वर्षांनंतर गीत आणि आदित्य म्हणजेच आपल्या सगळ्यांची लाडकी करिना कपूर खान आणि शाहिद कपूर पुन्हा एकदा मोठ्या पडद्यावर एकत्र दिसणार आहेत. शाहिद आणि करिनाचा गाजलेला सिनेमा 'जब वी मेट'चं सिक्वेल करण्यात येणार आहे. त्यात ही आपल्याला परत पहायला मिळणार आहे.

जब वी मेट'च्या सिक्वेलनिमित्तानं शाहिद आणि करिना पुन्हा मोठ्या पडद्यावर रोमांस करताना चाहत्यांना पहायला मिळणार आहे. या सिनेमामुळे त्यांच्या चाहत्यांमध्ये कमालीची उत्सुकता वाढली आहे. 11 वर्षांआधी करिना आणि शाहिदचा जब बी मेट हा सिनेमा ब्लॉकबस्टर झाला होता. आता त्या सिक्वेल बनवण्यात येणार आहे. हा सिनेमा चाहत्यांच्या मनावर काय जादू करतो हे पाहणं महत्त्वाचं आहे.

दरम्यान दिग्दर्शक इम्तियाझ अलीने शाहिद कपूरसोबत सिनेमा करण्याची इच्छा असल्याचं एका मुलाखतीत सांगितलं होतं. त्याची ही इच्छा लवकरच पुर्ण होणार असं दिसतय. पण या सिनेमाबद्दल करिनाला विचारला तिने धड होकारही नाही दिला आणि नकारही नाही दिला. त्यामुळे करिना या सिनेमासाठी होकार देणार का याकडेच सगळ्यांचं लक्ष लागले आहे.

First published: January 29, 2018, 12:02 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading