Home /News /entertainment /

'पवित्र रिश्ता 2' फेम अभिनेता शाहीर शेखच्या वडिलांचे कोरोनामुळे निधन

'पवित्र रिश्ता 2' फेम अभिनेता शाहीर शेखच्या वडिलांचे कोरोनामुळे निधन

Shaheer Shaikh

Shaheer Shaikh

हिंदी टेलिव्हिजन वरील लोकप्रिय अभिनेता शाहीर शेख (Shaheer Shaikh) याच्यावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. त्याचे वडील शाहनवाज शेख यांचे निधन झाले आहे.

    नवी दिल्ली, 20 जानेवारी: हिंदी टेलिव्हिजन वरील लोकप्रिय अभिनेता शाहीर शेख (Shaheer Shaikh) याच्यावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. त्याचे वडील शाहनवाज शेख यांचे निधन झाले आहे. काही दिवसांपूर्वी त्यांना कोरोनाची लागण झाली होती. दोनदिवसांपूर्वी, शाहीर शेखने ट्विट करत वडीलांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती दिली होती. शाहीर शेखने आपल्या वडिलांना कोरोनाची ची लागण झाल्याची माहिती सोशल मीडियावर दिली होती. वडिलांची प्रकृती चिंताजनक असून ते व्हेंटिलेटरवर असल्याचे त्याने ट्विटवर म्हटले आहे. तसेच त्यामध्ये कोरोनाची लागण झाल्याची माहितीदेखील देत आपल्या वडिलांसाठी प्रार्थना करण्याचे आवाहनही त्याने चाहत्यांना केले होते. टीव्ही अभिनेता आणि बिग बॉस 14 फेम अली गोनी याने ट्विट करून शाहीर शेखच्या वडिलांच्या निधनाबद्दल दुःख व्यक्त केले आहे. वडिलांसाठी प्रार्थना करण्याचे  केले होते आवाहन शाहीर शेख दोनदिवसांपूर्वी आपल्या ट्विटमध्ये लिहिले की, ‘मित्रांनो माझे वडील व्हेंटिलेटरवर आहेत. ते कोरोनाशी लढा देत आहे. कृपया त्यांच्यासाठी प्रार्थना करा जेणेकरून ते बरे होतील. शाहीर शेख याचे हे ट्विट सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होते. शाहीर शेखबद्दल बोलायचे झाल्यास तो टीव्ही इंडस्ट्रीतील प्रसिद्ध अभिनेत्यांपैकी एक आहेत. कुछ रंग प्यार के ऐसे भी आणि महाभारत यांसारख्या अनेक सीरिअल्समध्ये त्याने काम केलेय. सध्या तो पवित्र रिश्ता या वेब शोमुळे चर्चेत आलाय. पवित्र रिश्ता 2 चा ट्रेलर मंगळवारी रिलीज झाला. या शोमध्ये शाहीर शेखसोबत टीव्ही अभिनेत्री अंकिता लोखंडे मुख्य भूमिकेत आहे. पवित्र रिश्ता 2 मध्ये शाहीर शेखच्या व्यक्तिरेखेचे ​​नाव मानव आहे तर अंकिता लोखंडे अर्चनाची भूमिका साकारत आहे.
    Published by:Dhanshri Otari
    First published:

    Tags: Tv actor

    पुढील बातम्या