VIDEO: शाहरुखला मिळालं बर्थडेचं खास गिफ्ट; बुर्ज खलिफा टॉवरवरुन किंग खानला शुभेच्छा

VIDEO: शाहरुखला मिळालं बर्थडेचं खास गिफ्ट; बुर्ज खलिफा टॉवरवरुन किंग खानला शुभेच्छा

बॉलिवूड अभिनेता शाहरुख खान (Shah Ruk Khan) साठी हा वाढदिवस अतिशय खास ठरला आहे. बुर्ज खलिफावर किंग खानला शुभेच्छा देण्यात आल्या आहेत.

  • Share this:

मुंबई, 03 ऑक्टोबर: जगातील सर्वांत उंच बिल्डिंग आलेल्या दुबईतील बुर्ज खलिफावर बॉलिवूडचा अभिनेता शाहरुख खानला त्याच्या 55 व्या वाढदिवसाच्या खास शुभेच्छा देण्यात आल्या. बुर्ज खलिफावर शाहरुख खानला त्याच्या दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे, डॉन आणि रा-वन मधील भूमिकांचे फोटो दाखवत वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. या काचेच्या इमारतीवर विद्युत रोषणाईच्या माध्यमातून प्रोजेक्शन करून शुभेच्छा दिल्या जातात. त्यानंतर त्याने त्याच्या या शुभेच्छांबद्दल आपल्या ट्विटर आणि इन्टाग्राम अकाऊंटवर आभार मनात एक सुंदर मेसेज लिहिला. यामध्ये त्याने आपली मुलं सुहाना, आर्यन आणि अब्राम इम्प्रेस झाल्याचंदेखील म्हटलं आहे.

या मेसेजमध्ये त्याने लिहिलं की, ‘जगातील सर्वांत उंच स्क्रीनवर स्वतःला पाहणं आनंद द्विगुणीत करणारं होतं. माझा मित्र #MohamedAlabbarने माझ्या आगामी सिनेमा अगोदर माझं नाव या सर्वांत मोठ्या स्क्रीनवर लावलं आहे. बुर्ज खलिफा आणि इमार दुबई यांना धन्यवाद आणि खूप सारं प्रेम. माझी मुलं यामुळे प्रचंड इम्प्रेस झाली आहेत आणि मी देखील.’ बॉलिवूड सेलिब्रिटी करण जोहर आणि मनीष मल्होत्रा यांनी शाहरुख खानचा बुर्ज खलिफासमोर आनंद साजरा करतानाचा फोटो शेअर केला आहे. याचबरोबर शाहरुखने सोमवारी संध्याकाळी आपल्या चाहत्यांचे आभार मानण्यासाठी एक व्हिडिओ अपलोड केला आहे. यामध्ये त्याने त्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा देणाऱ्या चाहत्यांचे आभार मानले आहेत. या व्हिडिओत त्याने आभार मानताना त्याच्या काही फॅन क्लबचं नाव घेतलं असून त्यांच्या प्रेमाबद्दल त्याने त्यांचे आभार मानले आहेत. याचबरोबर कोरोनाच्या या काळात नागरिकांसाठी सामाजिक मदत आणि कार्य करणाऱ्या चाहत्यांचेदेखील आभार मानले.

View this post on Instagram

Happy birthday @iamsrk !! Love you !! May the lights shine on forever .... ❤️❤️❤️

A post shared by Karan Johar (@karanjohar) on

दरम्यान, या व्हिडिओमध्ये त्याने म्हटलंय, ‘सोशल  मीडियावरून माझ्या वाढदिवशी मला शुभेच्छा देणाऱ्या सर्व चाहत्यांचे आभार. माझ्या वाढदिवशी शुभेच्छा देण्याबरोबरच तुम्ही या अवघड परिस्तिथीत जी समाजसेवा करत आहेत त्या सर्वांचेही आभार. या काळात पीपीई किट वाटणं, रक्तदान शिबिर आयोजित करणं यांसारख्या सेवांसाठी तुमचे खूप आभार. त्याचबरोबर या काळात बाहेर पडून लोकांसाठी मदत करण्यासारखं कार्य तुम्ही करत आहात. त्यामुळे प्रेम वाटून तुम्ही माझ्यासारखे लव्हरबॉय होऊ शकता. यासाठी तुमचे खूप आभार. त्याने आपल्या चाहत्यांना लवकरच मोठे गेट टुगेदर आयोजित करण्याचे देखील प्रॉमिस केलं आहे. त्याचबरोबर या 55 व्या वाढदिवसापेक्षा 56 वा वाढदिवस मोठा होण्याची अपेक्षादेखील त्याने व्यक्त केली आहे.

Published by: Amruta Abhyankar
First published: November 3, 2020, 3:05 PM IST

ताज्या बातम्या