मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /

शाहरुखची भविष्यवाणी ठरली खोटी; लोकप्रिय अभिनेत्रीनं 25व्या वर्षीच घेतली निवृत्ती

शाहरुखची भविष्यवाणी ठरली खोटी; लोकप्रिय अभिनेत्रीनं 25व्या वर्षीच घेतली निवृत्ती

 लहान वयात तिनं केलेला अभिनय पाहून शाहरुख देखील अवाक झाला होता. एक दिवस ती मोठी अभिनेत्री होणार अशी भविष्यवाणी देखील त्यानं केली होती. मात्र शाहरुखची ही भविष्यवाणी खोटी ठरली.

लहान वयात तिनं केलेला अभिनय पाहून शाहरुख देखील अवाक झाला होता. एक दिवस ती मोठी अभिनेत्री होणार अशी भविष्यवाणी देखील त्यानं केली होती. मात्र शाहरुखची ही भविष्यवाणी खोटी ठरली.

लहान वयात तिनं केलेला अभिनय पाहून शाहरुख देखील अवाक झाला होता. एक दिवस ती मोठी अभिनेत्री होणार अशी भविष्यवाणी देखील त्यानं केली होती. मात्र शाहरुखची ही भविष्यवाणी खोटी ठरली.

  • Published by:  Mandar Gurav

मुंबई 4 मार्च: ‘कल हो ना हो’ (Kal Ho Naa Ho) हा बॉलिवूडमधील आजवरच्या सर्वाधिक लोकप्रिय चित्रपटांपैकी एक म्हणून ओळखला जातो. हा चित्रपट विशेष गाजला तो अभिनेत्री झनक शुक्ला (Jhanak Shukla) आणि शाहरुख खान (Shah Rukh Khan) यांच्या जबरदस्त केमिट्रीमुळं. त्यावेळी झनक केवळ सात वर्षांची होती. मात्र इतक्या लहान वयात तिनं केलेला अभिनय पाहून शाहरुख देखील अवाक झाला होता. एक दिवस ती मोठी अभिनेत्री होणार अशी भविष्यवाणी देखील त्यानं केली होती. मात्र शाहरुखची ही भविष्यवाणी खोटी ठरली. झनकनं अवघ्या 25 व्या वर्षीच सिनेसृष्टीतून निवृत्ती घेतली आहे. (Jhanak Shukla Retiring At 25)

अलिकडेच झनकनं Brut Indiaला मुलाखत दिली. या मुलाखतीत तिनं आपल्या करिअरवर भाष्य करत असताना निवृत्तीची घोषणा केली. “इतक्या लहान वयात मला इतकी प्रसिद्धी मिळेल असं वाटलं नव्हतं. त्यावेळी मला अभिनयाची प्रचंड आवड होती. परंतु वाढत्या वयानुसार चित्रपटांचं आकर्षण संपलं अन् अभ्यासामध्येच मी रमू लागले. सुरुवातीला असं वाटायचं की वयाच्या 24 व्या वर्षी माझ्याकडे भरपूर पैसे असतील अन् मी निवृत्ती घेऊन माझी सर्व स्वप्न पूर्ण करेन. परंतु आज 25 व्या वर्षी मी काहीच कमवत नाही आहे. किंबहूना मी सिनेसृष्टीतून निवृत्ती घेतली आहे. यापुढे मी इतिहास या विषयातच करिअर करण्याचा निर्णय घेतला आहे.” अशा आशयाची प्रतिक्रिया तिनं या मुलाखतीत दिली. या मुलाखतीच्या व्हिडीओ सोशल मीडियावर चर्चेत आहे.

View this post on Instagram

A post shared by Brut India (@brut.india)

VIDEO: शाहरुखच्या मुलाला क्लबमध्ये नो एण्ट्री; आर्यनला पाहताच वॉचमन भडकला अन्...

झनक ही बॉलिवूडमधील सर्वाधिक लोकप्रिय बालकलाकांरांपैकी एक म्हणून ओळखली जाते. वयाच्या पाचव्या वर्षीपासून तिनं अभिनय करण्यास सुरुवात केली होती. सुरुवातीला ती शाळेतील बालनाट्य स्पर्धांमध्ये भाग घेत असे. दरम्यान 2003 साली तिला करिश्मा का करिश्मा या सायफाय मालिकेतून तिनं छोट्या पडद्यावर पदार्पण केलं. या मालिकेत तिनं करिश्मा ही मुख्य व्यक्तिरेखा साकारली होती. ही मालिका त्यावेळी प्रचंड लोकप्रिय झाली अन् या लोकप्रितेच्या जोरावरच तिला कल हो ना हो या चित्रपटात शाहरुखसोबत काम करण्याची संधी मिळाली. त्यानंतर तिनं वन नाईट विथ किंग, डेडलाईन, सोन परी, हातिम, गुमराह, आहट यांसारख्या अनेक चित्रपट मालिकांमध्ये काम केलं. परंतु यशाच्या शिखरावर असतानाच तिनं एके दिवशी अभिनय न करण्याचा निर्णय घेतला. अन् आता तर तिनं थेट निवृत्तीची घोषणाच केली.

First published:

Tags: Bollywood News, Entertainment, Funny video, Instagram, Shah Rukh Khan, Social media viral