Elec-widget

दावोसमध्ये शाहरुख खानचा पुरस्कार देऊन केला गौरव!

दावोसमध्ये शाहरुख खानचा पुरस्कार देऊन केला गौरव!

हॉलिवूड अभिनेत्री केट ब्लँशेट आणि एल्टन जॉन यांनाही हा पुरस्कार देण्यात आला.

  • Share this:

23 जानेवारी : सगळ्यांचा लाडका अभिनेता किंग खान शाहरुखचा काल दावोसमध्ये पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला. मानवतावादी कार्य, महिला आणि लहान मुलांना समाजात समान आणि सन्मानपूर्वक वागणूक मिळावी यासाठी प्रयत्न केला, म्हणून शाहरुखचा दावोसमध्ये गौरव करण्यात आला. यावेळी हॉलिवूड अभिनेत्री केट ब्लँशेट आणि एल्टन जॉन यांनाही हा पुरस्कार देण्यात आला.

Loading...

शाहरुख नेहमीच मस्तीच्या मूडमध्ये असतो. त्यामुळे इथेही त्याचा हटके अंदाज पाहायला मिळाला. पुरस्कार स्विकारताना शाहरुखनं हॉलिवूड अभिनेत्री केट ब्लँशेटला सगळ्यांसमोर सेल्फी काढण्यासाठी विनंती केली. त्यातही त्याने सगळ्यांना खूप हसवलं. त्याने या कार्यक्रमाचे सगळे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

खरं तर दावोसमध्ये सध्या जोरदार बर्फवृष्टी सुरू आहे. त्यात शाहरुखने त्याच्या सिगनिचर स्टेपमध्ये एक झक्कास फोटोही काढला. शाहरुखने त्याच्या ट्विटर अकाऊंटवरुन हा फोटो त्याच्या चाहत्यांसाठी शेअर केला आहे. आणि त्यात त्यानं लिहलं की, 'स्वित्झर्लंडमध्ये येवून हे नाही केलं तर मग काय केलं? दावोसमध्ये राहण्यात मजा येत आहे.'

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jan 23, 2018 11:45 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...