Home /News /entertainment /

तुम्हालाही मिळू शकते शाहरुखसोबत Video Call वर बोलण्याची संधी, पण करावं लागेल हे काम

तुम्हालाही मिळू शकते शाहरुखसोबत Video Call वर बोलण्याची संधी, पण करावं लागेल हे काम

आपल्या चाहत्यांसाठी शाहरुखनं एक चॅलेंज दिलं आहे जे पूर्ण करणाऱ्या चाहत्याला किंग खानसोबत व्हिडीओ कॉलवर बोलायची संधी मिळणार आहे.

    मुंबई, 10 मे : कोरोना व्हायरसमुळे करण्यात आलेल्या या लॉकडाऊनमध्ये सर्वांनाच घरी बसून कंटाळा आला आहे. सर्वांनाच काही तरी मजेदार करावं असं वाटतंय पण या लॉकडाऊनमुळे ते शक्य नाही. पण बॉलिवूड किंग शाहरुखनं त्याच्या चाहत्यांसाठी एक स्पेशल टास्क आणला आहे जो पूर्ण केल्यावर त्या चाहत्याला चक्क शाहरुखसोबत व्हिडीओ कॉलवर बोलायची संधी मिळणार आहे. शाहरुखनं त्याच्या सोशल मीडियावर हा टास्क पूर्ण करण्याचं चॅलेंज दिलं आहे. शाहरूख खाननं त्याच्या सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे. ज्यात त्यानं या टास्कचे सर्व डिटेल्स दिले आहेत. शाहरुखनं लिहिलं, सध्या लॉकडाऊनमुळे आपल्या सर्वांकडेच बराच रिकामी वेळ आहे. मला वाटतं यामध्ये आपण काहीतरी मजेदार करू शकतो. काहीतरी क्रिएटिव्ह करून हा वेळ सत्करणी लावू शकतो. हॉरर सिनेमा पाहायला सर्वांना आवडतं. आता या लॉकडाऊनमध्ये आपण सर्वंच वेगवेगळे सिनेमा पाहून वेळ घालवत आहोत त्यापेक्षा स्वतःमधल्य़ा फिल्ममेकरला जागवा आणि एक इनडोअर हॉरर फिल्म शूट करा. दोन घटस्फोटांनंतर श्वेता तिवारीनं पहिल्यांदाच बोलून दाखवली मनातली सल, म्हणाली... शाहरुखनं त्याच्या चाहत्यांना हॉरर फिल्म शूट करण्याचं चॅलेंज केलं आहे. पण याला काही नियम सुद्धा आहेत. यानुसार तुम्ही कोणताही कॅमेरा वापरू शकता. ज्यात तुम्ही घरातल्या प्रॉपचा वापर करू शकता. ही फिल्म तुम्ही एक पेक्षा जास्त लोकांसोबत शूट करु शकता. मात्र यात सोशल डिस्टंसिंगची काळजी घेणं गरजेच आहे. शाहरुखनं त्याच्या पोस्टमध्ये सांगितलं आहे की, 18 मे पर्यंत तुम्ही तुमची फिल्म teamdigital@redchillies.com वर पाठवायची आहे. ही फिल्म पॅट्रिक ग्राहम, विनित कुमार, आहाना कुमरा आणि गौरव वर्मा जज करतील या नुसार तीन लकी चाहत्यांना शाहरुख सोबत व्हिडीओ कॉलवर बोलायची संधी मिळणार आहे. कोरोनाशी संबंधीत आहे KBC Registration चा पहिला प्रश्न, काय आहे अचूक उत्तर शाहरुख मागच्या काही दिवसांपासून त्याची नवी वेब सीरिज 'बेताल'मुळे चर्चेत आहे. ही वेब सीरिज शाहरुखचं प्रोडक्शन हाऊस रेड चिलीज एंटरटेनमेंटच्या बॅनर तयार केलं जात आहे. 24 मे ला ही वेब सीरिज नेटफ्लिक्सवर रिलीज होणार आहे. याचा ट्रेलर काही दिवसांपूर्वीच रिलिज झाला आहे. ना कपूर ना खान, लॉकडाऊनमध्ये Google वर सर्वाधिक सर्च झाल्या या हॉट अभिनेत्री
    Published by:Megha Jethe
    First published:

    Tags: Bollywood, Shahrukh khan

    पुढील बातम्या