DDLJच्या 'या' गाण्याचं अफलातून रिक्रिएशन; शाहरुख खानने शेअर केलेला VIDEO एकदा पाहाच

DDLJच्या 'या' गाण्याचं अफलातून रिक्रिएशन; शाहरुख खानने शेअर केलेला VIDEO एकदा पाहाच

दिलवाले दुल्हनिया लें जाऐगें या सिनेमातील एका गाण्याचं रिक्रिशन करण्यात आलं आहे. खुद्द शाहरुख खान (Shah rukh Khan)नेच हा व्हिडीओ ट्विटवर शेअर केला आहे.

  • Share this:

मुंबई, 28 ऑक्टोबर: बॉलिवूडची ब्लॉकबस्टर फिल्म 'दिलवाले दुल्हनिया लें जाएंगें' (Dilwale Dulhania Le Jayenge) ला नुकतीच 25 वर्ष पूर्ण झाली. त्यानिमित्ताने काही दिवसांपासून DDLJचे फोटो, गाणी, सिनेमांतले काही किस्से ट्रेंड होत आहेत. DDLJच्या एका गाण्याचा सीन युट्यूबर ‘वीणा फॅन’ हिने रिक्रिएट केला आहे. जरासा झूम लू मैं हे गाणं वीणाने हुबेहुब रिक्रिएट केलं आहे. हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच ट्रेंड होत आहे. हा व्हिडीओ ट्रेंड होण्यामागे आणखी एक कारण आहे. कारण या व्हिडीओची दखल खुद्द शाहरुख खान (Shah Rukh Khan)ने घेतली आहे.

जरा सा झूम लू मैं हे गाणं वीणाने जसंच्या तसं रिक्रिएट केलं आहे. मुळ गाण्यासारखेच कपडे, गाण्यात आहेत तशाच स्टेप्स वीणाच्या व्हिडीओमध्येही आहेत. हा व्हिडीओ शाहरुख खानलाही खूप आवडला आहे. शाहरुखने आपल्या ट्विटर अकाऊंटवर हा व्हिडीओ शेअर केला आहे. आणि त्यांचे आभारही मानले आहेत. पाहुयात त्या व्हिडीओची एक झलक

दरम्यान झीरो (Zero) बॉक्स ऑफिसवर आपटला. त्यानंतर शाहरुखने 2 वर्षाचा ब्रेक घेतला होता. किंग खान 2 वर्षाच्या ब्रेकनंतर चांगलाच फॉर्ममध्ये आला आहे. त्याने एक नाही 2 नाही तब्बल 3 फिल्म साईन केल्या आहेत. तसंच पठाण सिनेमामध्ये शाहरुख खानसोबत जॉन अब्राहम आणि दीपिका पादुकोण यांच्याही भूमिका आहेत. नोव्हेंबर महिन्यात पठाण सिनेमाच्या शूटिंगला सुरुवात होईल. पहिल्या शेड्यूलमध्ये शाहरुखचं शूटिंग होणार आहे. तर जानेवारीमध्ये पठाण सिनेमाचं दुसरं शेड्यूल सुरू होणार आहे. त्यात जॉन अब्राहम आणि दीपिका पादुकोण यांचं शूटिंग होणार आहे. मुंबईच्या यशराज फिल्म्स स्टुडिओमध्ये शाहरुख शूट करणार आहे. त्यानंतर या अभिनेत्याकडे राजकुमार हिरानी आणि एका दाक्षिणात्य फिल्ममेकरच्या सिनेमाचाही ऑफर आहे. शाहरुख खान पहिल्यांदाच साऊथ इंडियन दिग्दर्शक एलटी यांच्यासोबत काम करणार आहे. या सिनेमामध्ये शाहरुखचा डबल रोल असेल. या आधी त्याने ड्युप्लीकेट आणि डॉन या सिनेमांमध्ये डबल रोल साकारला होता.यामध्ये शाहरुख मुलगा आणि वडीलांची भूमिका साकारणार आहे.’ 2 पिढ्यांमधील अंतर’ हा विषय या सिनेमामध्ये हाताळला जाणार आहे.

Published by: Amruta Abhyankar
First published: October 28, 2020, 8:03 PM IST

ताज्या बातम्या