मुंबई 13 जुलै: देवदास (Devdas) हा बॉलिवूडमधील आजवरच्या सर्वाधिक लोकप्रिय चित्रपटांपैकी एक म्हणून ओळखला जातो. शाहरुख खानचा जबरदस्त अभिनय, माधुरी दिक्षित (Madhuri Dixit) व ऐश्वर्या राय (Aishwarya Rai) यांची अनोखी जुगलबंदी आणि अफलातून गाणी यामुळे देवदास सुपरहिट ठरला होता. या चित्रपटाला आज तब्बल 19 वर्ष पूर्ण झाली आहेत. त्यानिमित्तानं चित्रपटातील जवळपास प्रत्येक कलाकारानं या चित्रपटातील काही गंमतीशीर अनुभव शेअर केले. मात्र यामध्ये शाहरुखने सांगितलेली गंमत सध्या सर्वांचेच लक्ष वेधून घेत आहे.
“दिवस-रात्र काम करुन आम्ही या चित्रपटाची निर्मिती केली होती. दरम्यान आम्हाला अनेक कठीण प्रसंगांचा सामना करावा लागला. परंतु ऐश्वर्या राय, माधुरी दिक्षित, अनुपम खेर, जॅकी श्रॉफ आणि आमचे दिग्दर्शक संजय लीला भंसाळी यांनी कमालिचा संयम दाखवला. हा मास्टरपीस चित्रपट तयार केल्याबद्दल संपूर्ण टीमला धन्यवाद. पण या काळात मी एका समस्येनं मात्र त्रासलो होतो. माझा धोतर सतत सुटायचा.” अशा आशयाचं ट्विट करत शाहरुखनं आपल्या जुन्या आठवणींना उजाळा दिला. सोबतच त्याने काही शूटिंगच्या वेळचे फोटो देखील शेअर केले आहेत.
'अग्निपथ'मधील हृतिक रोशनची बहीण आठतेय का? आता दिसतेय फारच ग्लॅमरस आणि बोल्ड
All the late nights,early mornings,problems worked out bcoz of the gorgeous @MadhuriDixit,the stunning Aishwarya,ever cheerful @bindasbhidu, full of life @KirronKherBJP & the whole team slogging under the masterful Bhansali. Only issue-the dhoti kept falling off! Thx for the love pic.twitter.com/oc9BvF1nNw
— Shah Rukh Khan (@iamsrk) July 12, 2021
'तू तर महाराष्ट्राचा Ranveer Singh'; अभिजीत खांडकेकरचा हटके LOOK चर्चेत
देवदास ही प्रसिद्ध बंगाली लेखक शरतचंद्र चॅटर्जी यांची कादंबरी आहे. याच कादंबरीवर आधारित संजय लीला भन्साळी यांनी चित्रपटाची निर्मिती केली होती. हा मस्टिस्टारर चित्रपट 19 वर्षांपूर्वी तुफान गाजला होता. या चित्रपटामुळेच भन्साळींना बॉलिवूमधील नामांकित दिग्दर्शकांच्या पंक्तित स्थान मिळालं असं म्हटलं जातं. यामध्ये त्यांनी उभारलेले भव्यदिव्य सेट त्यावेळी सर्वांच्याच चर्चेचा विषय ठरले होते.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Aishwarya rai, Madhuri dixit, Shah Rukh Khan