Home /News /entertainment /

शाहरुख खानच्या मुलीसोबत डेटवर जायचंय? तर पाळावे लागतील हे 7 नियम

शाहरुख खानच्या मुलीसोबत डेटवर जायचंय? तर पाळावे लागतील हे 7 नियम

शाहरुख खाननं सुहानाला डेट करणाऱ्या व्यक्तीसाठी सात नियम बनवले आहेत. त्याची सर्वत्र चर्चा होत आहे.

    मुंबई 22 मे: बॉलिवूडचा (Bollywood) किंग खान शाहरुख खान (Shah rukh Khan)आपल्या मुलांबाबत अतिशय पझेसिव्ह आहे. विशेषतः आपली मुलगी सुहाना (Suhana)हिच्याबाबत तर फारच. त्यानं स्वतःच हे मान्य केलं आहे. आज किंग खानची ही लाडकी मुलगी आपला 21वा वाढदिवस साजरा करत आहे. या पार्श्वभूमीवर, शाहरुख खाननं सुहानाला डेट करणाऱ्या व्यक्तीसाठी सात नियम बनवले आहेत. त्याची सर्वत्र चर्चा होत आहे. नुकतंच त्यानं आपल्या मुलीला कोणी किस केलं तर त्याचे ओठ कापून टाकीन असंही म्हटलं होतं. सुहानाचा जन्म 22 मे 2000 रोजी  मुंबईत झाला होता.  शाहरुख आणि गौरीची ही मुलगी अतिशय ग्लॅमरस आणि बोल्ड असून, सोशल मीडियावर चांगलीच सक्रिय असते. तिचे फोटो सोशल मीडियावर अनेकदा व्हायरल होत असतात. सोशल मीडियावर तिचे लाखो चाहते आहेत. अभिनयाची (Acting) आवड असलेली सुहाना आता बॉलिवूडमध्ये पदार्पण (Bollywood Debut) करण्याची तयारी करत असून, सध्या न्यूयॉर्कमध्ये फिल्म मेकिंग आणि अभिनयाचं शिक्षण घेत आहे. अर्थात ती मोठ्या पडद्यावर कधी दिसणार आहे, हे मात्र अजून गुपितच आहे. सुहानाला डान्स आणि स्पोर्ट्सचीही आवड आहे. 18 व्या वर्षीच तिचा फोटो ग्लॅमरच्या विश्वातील लोकप्रिय मासिक व्होगच्या (Vogue)मुखपृष्ठावर झळकला होता. स्वतः शाहरुख खान यानं हे मुखपृष्ठ सादर केलंहोतं. सर्वात लोकप्रिय सेलिब्रिटी किड असलेली सुहाना शाहरुख खानची अत्यंत लाडकी आहे. 2017 मध्येच  किंग खाननं एखाद्या मुलाला आपल्या मुलीशीडेट (Date)करायचे असेल तर 7 कठोर नियम (7 Rules for Suhana’s Boyfriend) पाळावे लागतील , असं फेमिनाला दिलेल्या मुलाखतीत स्पष्ट केलं होतं. आपल्या मुलीच्या आयुष्यात एक चांगला माणूस हवा आहे, असंही त्यानं स्पष्ट केलं होतं. त्या व्यक्तीसाठी असलेले7नियम : 1. नोकरी (Job)असणे. 2. तुम्ही मला आवडत नाही हे गृहीत धरून चला. 3. मी तुमच्यावर नेहमीच नजर ठेवणार. 4.वकील नेहमीच तुमच्याबरोबर असेल. 5. ती माझी राजकन्या आहे, तुम्ही तिला जिंकलेलं नाही, हे लक्षात ठेवा. 6. तिला त्रास दिलास तर मला तुरुंगात जाण्याची भीती वाटत नाही, हे लक्षात ठेवा. 7. तुम्ही तिच्याशी जसे वागाल तसाच मी तुमच्याशी वागेन. अर्थात, हे नियम वगैरे एक दिखावा आहे. माझ्या मुलीला कोणी आवडलं तर मी काहीही बोलू शकणार नाही आणि त्याचा स्वीकार करेन, असंही शाहरुखनं एनडीटीव्हीच्या स्पॉटलाइट कार्यक्रमात कबूल केलं होतं.
    First published:

    Tags: Shah Rukh Khan, Suhana khan

    पुढील बातम्या