टमुंबई, 28 ऑक्टोबर: शाहरुख खान (Shah rukh Khan) गेल्या काही दिवसांपासून मोठ्या पडद्यापासून दूर असला तरी सोशल मीडिया (Social Media)वरुन सतत आपल्या फॅन्सची गप्पा मारत असतो. शाहरुखच्या ट्विटर हँडलवर #AskSRK या सेशनमध्ये एका फॅनने शाहरुखला असा प्रश्न विचारला की, किंग खानदेखील चक्रावून गेला. वसीम नावाच्या एका नेटकऱ्याने चक्क ‘तुझा मन्नत बंगला विकणार आहेस का?’ असा प्रश्न विचारला.
आता मन्नत आणि शाहरुखचं प्रेम तर आपल्या सगळ्यांनाच माहित आहे. त्यामुळे या फॅनने असा प्रश्न विचारल्याने शाहरुखने त्या फॅनची चांगलीच शाळा घेतली. शाहरुख म्हणाला, ‘भाई मन्नत बिकती नहीं सर झुकाकर मांगी जाती हैं याद रखोगें तो लाइफ में कुच पा सकोंगे’ शाहरुख खानचं हे उत्तर त्याच्या इतर फॅन्सना खूपच आवडलं. शाहरुखच्या या उत्तरावर अनेक लाइक्स आणि शेअर्स आले आहेत.
Bhai Mannat bikti nahi sar jhuka kar maangi jaati hai....yaad rakhoge toh life mein kuch paa sakogay. https://t.co/dh3gJTVnOu
शाहरुखचा बंगला मुंबईतल्या आयकॉनिक इमारतींमधला एक बंगला आहे. बांद्र्यामध्ये समुद्राजवळ असलेला मन्नत बंगला विकत घेण्यासाठी बॉलिवूडच्या या बादशाहाने खूप मेहनत केली आहे. शाहरुखचे अनेक फॅन्स फक्त त्याचा बंगला बघण्यासाठी संपूर्ण देशभरातून बांद्र्याला येतात.
शाहरुख खान लवकरच पठाण सिनेमाच्या शूटला सुरुवात करणार आहे. या सिनेमात त्याच्यासोबत दीपिका पादुकोण आणि जॉन अब्राहमदेखील झळकणार आहेत. याशिवाय आणखी 2 प्रोजेक्टवर शाहरुखचं काम सुरू आहे.