मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /

त्या खडतर प्रसंगाबद्दल बोलताना जॉनी लिवर म्हणले, वडील आजारी असताना शाहरुखने...

त्या खडतर प्रसंगाबद्दल बोलताना जॉनी लिवर म्हणले, वडील आजारी असताना शाहरुखने...

शाहरुख खान (Shah Rukh Khan) आणि जॉनी लिवर (Johnny Lever) यांची मैत्री सगळ्या इंडस्ट्रीमध्ये सर्वज्ञात आहे. जॉनी लिवरने शाहरुखचा एक मैत्रीचा किस्सा सांगितला आहे.

शाहरुख खान (Shah Rukh Khan) आणि जॉनी लिवर (Johnny Lever) यांची मैत्री सगळ्या इंडस्ट्रीमध्ये सर्वज्ञात आहे. जॉनी लिवरने शाहरुखचा एक मैत्रीचा किस्सा सांगितला आहे.

शाहरुख खान (Shah Rukh Khan) आणि जॉनी लिवर (Johnny Lever) यांची मैत्री सगळ्या इंडस्ट्रीमध्ये सर्वज्ञात आहे. जॉनी लिवरने शाहरुखचा एक मैत्रीचा किस्सा सांगितला आहे.

  • Published by:  Amruta Abhyankar
मुंबई, 07 डिसेंबर: कोणतीही फिल्मी पार्श्वभूमी नसताना, अभिनयाच्या जोरावर छोट्या पडद्यापासून सुरुवात करून बॉलिवूडच्या (Bollywood) सुपरस्टार पदापर्यंत पोहोचलेल्या शाहरुख खानच्या आयुष्याबद्दल (Shah Rukh Khan) सर्वांनाच कुतूहल असतं. त्याच्याबद्दल अनेक किस्से, कहाण्या सांगितल्या जातात. पण हा सुपरस्टार मैत्रीला जागणारा, मैत्री जपणारा माणूस आहे. त्याच्या या स्वभावाचा अनोखा पैलू उलगडला आहे विनोदाचा बादशहा जॉनी लिवरनं. शाहरुख खान (Shah Rukh Khan) आणि जॉनी लिवर (Johnny Lever) यांनी अनेक चित्रपटांमध्ये एकत्र काम केलं आहे. दोघांनीही यशाच्या शिखरावर पोहोचण्यासाठी खूप संघर्ष केला आहे. दोघांची एकमेकांशी चांगली मैत्री आहे. माणूस म्हणून शाहरुख खान किती मोठा आहे, याची झलक दाखवणारा एक किस्सा जॉनी लिवरनं शेअर केला आहे. शाहरुख खान नेहमीच आपला सर्वांत आवडता सहकलाकार म्हणजे जॉनी लिवर असल्याचं आवर्जून सांगत असतो. जॉनी लिवरनं शाहरुखच्या उमद्या स्वभावाचा एक किस्सा नुकताच बॉलिवूड हंगामाशी बोलताना सांगितला आहे. बादशहा (Badshah) चित्रपटादरम्यानचा हा प्रसंग आहे. शाहरुख आणि जॉनी लिवर एकत्र काम करत होते. एका विनोदी प्रसंगाचं चित्रीकरण होणार होतं, पण जॉनी लिवरच्या वडिलांचं त्याच दिवशी ऑपरेशन होणार होतं. कामाच्या आड कोणतीही वैयक्तिक अडचण आणायची नाही, हे तत्व असल्यानं जॉनीनं कोणालाही याबाबत सांगितलं नव्हतं. पण कसं कोणजाणे शाहरुख खानला ही घटना कळली. तो थेट जॉनीकडे आला. तो प्रसंग सांगताना जॉनी आजही भावूक होतो. त्या प्रसंगांची आठवण सांगताना तो म्हणाला, ‘मला चित्रपटात विनोदी प्रसंग साकारायचा होता पण त्याच वेळी माझ्या वडिलांचे ऑपरेशन होणार होते. मी खूप  काळजीत होतो. त्या दिवशी शाहरुख खानला कुठून माझ्या वडिलांच्या तब्येतीबद्दल कळलं माहीत नाही. तो माझ्या रूममध्ये आला आणि मला म्हणाला तुझ्या वडिलांबद्दल मला कळलं. त्यानंतर तो माझ्या वडिलांबद्दल विचारू लागला. पण विनोदी प्रसंग साकारायचा असल्यानं मी या गंभीर विषयाबाबत बोलण्याचे टाळू लागलो. शाहरुख खान मात्र सतत मला आपुलकीनं विचारत होता. काहीही मदत लागली तर मला सांग असं त्यानं मला पुन्हापुन्हा सांगितलं. शाहरुख खान आणि जॉनी लिवर यांनी 15 पेक्षा जास्त चित्रपटांमध्ये एकत्र काम केलं आहे. बाजीगर, करण-अर्जुन, कुछ कुछ होता है, कभी खुशी कभी गम, येस बॉस आणि बादशहा हे त्यापैकी काही महत्त्वाचे चित्रपट. शाहरुख खानने एकदा जॉनी  लिवर बद्दल बोलताना सांगितले होते की, ‘विनोदी भूमिका करत असला तरी आयुष्याकडं अतिशय गंभीरपणे बघणारा हा माणूस आहे. बाहेरून त्याच्याकडे बघून कोणालाही वाटणार नाही की हा माणूस आतिशय गंभीर आहे. कधीही कुणाला मदतीची गरज असेल त्यावेळी जॉनीभाई तिथं मदतीला नक्की उभा असेल, याची मला खात्री आहे. कोणाच्याही मदतीसाठी पहिल्यांदा धावणारा माणूस म्हणजे जॉनीभाई.’ असं शाहरुखने सांगितलं होतं.
First published:

Tags: Bollywood, Shah Rukh Khan

पुढील बातम्या