शाहरूखचं अलिबागमधील फाॅर्महाऊस आयकर विभागाने केलं सील

शाहरूखचं अलिबागमधील फाॅर्महाऊस आयकर विभागाने केलं सील

शाहरुखचा अलिबागमधला 75 कोटींचा फाॅर्महाऊस आयकर विभागाने सील केला आहे.

  • Share this:

30 जानेवारी : बाॅलिवूडचा किंग खान अर्थात शाहरुख खानला चांगलाच धक्का बसलाय. शाहरुखचा अलिबागमधला 75 कोटींचा फाॅर्महाऊस आयकर विभागाने सील केला आहे.

अलिबागमध्ये शाहरूख खानचा 75 कोटींची अलिशान बंगला आहे. या बंगल्यावर अलीकडेच शाहरूखने बर्थ डे पार्टी जोरात सेलिब्रेशन केलं होतं. हा फाॅर्महाऊस 19960 स्क्वेअर फुटाचं आहे. ज्याची किंमत जवळपास 75 कोटी इतकी आहे.

मात्र, हा बंगला शाहरुखनं शेतजमिनीवर बांधल्याचं समोर आलंय. शाहरुखला या संदर्भात डिसेंबरमध्येच नोटीस पाठवण्यात आली होती. शाहरुख, त्याची कंपनी रेड चिल्ली आणि कोलकाता नाईट रायडर्स यांना संदर्भात आयकर विभागातर्फे मेलही करण्यात आले होते. अखेर शेतजमिनीचा वापर केल्याप्रकरणी पीबीपीटी अंतर्गत फार्महाऊसला सिल करण्यात आलंय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jan 30, 2018 07:06 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading