या व्हायर स्टोरीने सर्वांचे मन जिंकले आहे. शाहरूखचा हा चाहता मिस्रमधील एक ट्रॅव्हल एजेंट आहे. ज्याने कसलेही पैसे न घेता एका भारतीय महिलेचे तिकिट बुक केले. कारण ती शाहरूख खानच्या देशातील आहे. आता शाहरूखला ही गोष्ट समजल्यानंतर त्याने त्याच्या चाहत्यासाठी एक खास भेट पाठवली आहे. शाहरूखने या चाहत्याला व त्याच्या मुलीला एक ऑटोग्राफसोबत एक स्वत:चा फोटो पाठवला आहे. वाचा-शुभमंगल सावधान! अखेर रोहित -जुईलीच्या डोई पडल्या अक्षता अश्विनी देशपांडे या महिलेने ट्विटरवर या घटनेचा उल्लेख करत म्हटलं आहे की, मिस्रमध्ये एका ट्रॅव्हल एजेंटला पैसे ट्रांसफर करायचे होते. मात्र पैसे ट्रांसफर करताना अडचण येत होती. त्यावेळी ते म्हणाले , तुम्ही शाहरूख खानच्या देशातील आहे. मला तुमच्यावर पूर्ण विश्वास आहे. मी तुमचे बुकिंग करते नंतर तुम्ही मला पैसे द्या. दुसऱ्या कुणासाठी मी असं करणार नही. मात्र शाहरूख खानसाठी कायपण....Needed to transfer money to a travel agent in Egypt. Was having problems with the transfer. He said: you are from the country of @iamsrk. I trust you. I will make the booking, you pay me later. For anywhere else, I wouldn't do this. But anything for @iamsrk. & he did!#SRK is
— Ashwini_Deshpande (@AshwDeshpande) December 31, 2021
या ट्वीटनंतर शाहरूख खानने आपल्या चाहत्यासाठी असं काही केलं ज्याची सगळीकडे चर्चा रंगली. एका अन्या ट्विटर अपडेटच्या माध्यमातून देशपांडे यांनी याबद्दल माहिती दिली आहे. यामध्ये म्हटले होते की, या गोष्टीचा सुखकर शेवट. शाहरूख खानच्या सही असलेले तीन फोटो आज मिळालेत. एक मिस्त्रच्या ट्रॅव्हाल एंजेटसाठी व दुसरी त्याच्य मुलीसाठी आणि तिसरी माझ्यासाठी. केतकी वर्मा धन्यवाद..!A very happy ending to this story. 3 photos signed by SRK arrived today, one with the nicest message for the Egyptian travel agent, one for his daughter & one for mine @Ketaki_Varma Thanks @pooja_dadlani for getting in touch & of course to @iamsrk for the gracious gesture https://t.co/lYd431dBUq pic.twitter.com/Rhn1ocQlbo
— Ashwini_Deshpande (@AshwDeshpande) January 22, 2022
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.