News18 Lokmat

शाहरुख खानला लंडन विद्यापीठाकडून मिळाली मानद डॉक्टरेट

विद्यापीठाच्या वार्षिक पदवीप्रदान समारंभात गुरुवारी (04 मार्च) शाहरुखला या पदवीनं सन्मानित करण्यात आलं. यावेळी विद्यापीठाच्या इतर 300 विद्यार्थ्यांचा पदवी प्रदान सोहळा पार पडला.

News18 Lokmat | Updated On: Apr 5, 2019 04:32 PM IST

शाहरुख खानला लंडन विद्यापीठाकडून मिळाली मानद डॉक्टरेट

मुंबई, 05 एप्रिल : अभिनेता शाहरुख खानला आता पर्यंत अनेक जागतिक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आलं आहे. याआधी शाहरुखला बेडफोर्डशायर विद्यापीठ आणि एडिनबरा विद्यापीठाकडून मानद डॉक्टरेट पदवीनं सन्मानित करण्यात आलं होतं त्यानंतर आता त्याच्या सन्मानात आणखी एका पदवीची भर पडली आहे. शाहरुखला नुकतीच 'लंडन युनिव्हर्सिटी ऑफ लॉ'ची मानद पीएचडी पदवी प्रदान करण्यात आली. विद्यापीठाच्या वार्षिक पदवीदान समारंभात गुरुवारी (04 मार्च) शाहरुखला या पदवीनं सन्मानित करण्यात आलं. यावेळी विद्यापीठाच्या इतर 300 विद्यार्थ्यांनासुद्धा पदवी प्रदान करण्यात आली.
 

Loading...

View this post on Instagram
 

#UniversityOfLawHonoursSRK at the @barbicancentre


A post shared by Shah Rukh Khan (@iamsrk_iian) on

या पदवी प्रदान सोहळ्यात बोलताना शाहरुख म्हणला, 'कोणताही प्रकारचा दानधर्म हा नेहमीच शांतपणे करायला हवा. त्याचा गाजावाजा केल्यास आपण त्याचं महत्त्व गमावून बसतो. जगातल्या गरजू लोकांसाठी  मी माझ्याकडे असलेली गुणवत्ता वापरावी म्हणून हा विशेष अधिकार मिळाला आहे. मी महिला सशक्तीकरणासाठी तसेच मूलभूत मानवी हक्कांपासून वंचित असलेल्या लोकांसाठी नेहमीच मदतीसाठी तत्पर असतो. कारण मला या माझ्या चाहत्यांनी बरंच काही दिलं आहे त्यामुळे आता त्याची परतफेड करण्याची माझी वेळ आहे. हा सन्मान देण्यासाठी माझी निवड करून मला सन्मानित केल्याबद्दल मी सर्वांचा आभारी आहे.'
शाहरुखनं अभिनय क्षेत्रात नाव कमावल्यानंतर आता तो निर्मिती आणि व्हीएफएक्स क्षेत्रातही उतरला आहे. याशिवाय आयपीएलच्या कोलकाता नाईट रायडर्स संघाचा मालक आहे. तसंच त्याची मीर फाउंडेशन संस्था अ‍ॅसिड हल्ला पीडीतांसाठी ना नफा तत्वावर काम करते. यासाठी 2018 मध्ये शाहरुखला वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमच्या क्रिस्टल अवॉर्डनं सन्मानित करण्यात आलं होतं. भारतातील पल्स पोलिओ आणि एड्सच्या जनजागृतीसाठीच्या चळवळीमध्ये शाहरुखचा नेहमीच सक्रिय सहभाग होता. तसंच त्याची 'मेक अ विश फाऊंडेशन' ही संस्था अनाथ आणि मूलभूत सुविधांपासून वंचित असलेल्या मुलांसाठी काम करते.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Apr 5, 2019 04:32 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...