शाहरुख खानच्या चाहत्यांनी बनवले 'Pathan' चित्रपटाचे भन्नाट पोस्टर, PHOTO VIRAL

शाहरुख खानच्या चाहत्यांनी बनवले 'Pathan' चित्रपटाचे भन्नाट पोस्टर, PHOTO VIRAL

अलीकडेच दीपिकाने (deepike padukone) एका मुलाखतीत पठाण चित्रपटाबद्दल (Pathan movie) खुलासा केला आहे.

  • Share this:

नवी दिल्ली, 20 जानेवारी: गेल्या अनेक दिवसांपासून यशराज फिल्म्स निर्मित 'पठाण' चित्रपटाबद्दल अनेक बातम्या येत आहेत. पण अद्याप निर्मात्यांनी याबाबत अधिकृतपणे काहीही सांगितलं नाही. अलीकडेच दीपिका पादुकोणने खुलासा केल्यानंतर चाहत्यांमध्ये 'पठाण' चित्रपटाबद्दल उत्सुकता ताणली आहे. याच पार्श्वभूमीवर चाहत्यांनी 'पठाण' चित्रपटाचे अनेक पोस्टर बनवले आहेत. जे सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत.

या चित्रपटाचं पोस्टर पाहिल्यानंतर सर्व चाहत्यांनी सोशल मीडियावर धुमाकूळ घालायला सुरुवात केली आहे. त्यावर भन्नाट कमेंट येत आहेत. पण सर्वात महत्त्वाचं म्हणजे हे पठाण चित्रपटाचे अधिकृत पोस्टर नाहीत, ते एका चाहत्याने बनवली आहेत. ज्यातून चाहते या चित्रपटाबद्दल उत्सुक आहेत, हे स्पष्ट होतं. या पोस्टरमध्ये चाहत्याने यशराज बॅनरचा लोगो टाकला असून शाहरुख खानला अ‍ॅक्शन मोडमध्ये दाखवला आहे. किंग खानसोबतच दीपिका पादुकोण आणि जॉन अब्राहम यांना देखील या पोस्टरमध्ये अ‍ॅक्शन अवतारत दाखवलं आहे.

'पठाण' चित्रपटामध्ये शाहरुख खान आणि दीपिकासमवेत जॉन अब्राहमही मुख्य भुमिकेत दिसणार असल्याचं बोललं जात आहे. पण याबाबत चित्रपट निर्मात्यांनी काहीही खुलासा केलेला नाही. पण जॉन या चित्रपटात खलनायकाच्या भूमिकेत दिसणार असल्याचं म्हटलं जात आहे.

यशराज प्रोडक्शनच्या बॅनरखाली निर्माण होणार्‍या ‘पठाण’ चित्रपटामध्ये सलमान खानदेखील कॅमिओ म्हणून दिसू शकतो. हा चित्रपट म्हणजे अ‍ॅक्शन ड्रामाचा मोठा धमाका असणार आहे. इतकंच नाही तर या चित्रपटाचं बजेटदेखील लवकरच बातम्यांच्या मथळ्यांत दिसायला सुरू होईल. कारण हा चित्रपट म्हणजे बॉलीवूडमधील सर्वात जास्त बजेट असणारा चित्रपट ठरणार आहे. मीडिया रिपोर्टनुसार, 'पठाण' चित्रपट 2021 सालच्या दिवाळीला प्रदर्शित होऊ शकतो.

शाहरुख खानचा शेवटचा चित्रपट 'झिरो' होता. जो बॉक्स ऑफिसवर प्लॉप ठरला होता. त्यानंतर शाहरुख चांगली स्क्रिप्ट शोधत होता. त्यामुळेच शाहरुख यावेळी चित्रपटाचा सर्व अंगानी विचार करून काळजीपूर्वक पाऊलं उचलत आहे. यावेळी चाहते निराश होऊ नयेत, म्हणून या चित्रपटाच्या प्रत्येक सीनकडे विशेष लक्ष दिलं जात आहे.

Published by: News18 Desk
First published: January 20, 2021, 9:02 PM IST

ताज्या बातम्या