मुंबई, 17 जानेवारी : बॉलिवूडचा बादशहा अशी ओळख असलेला अभिनेता शाहरुख खान नेहमीच वेगवेगळ्या कारणांमुळे चर्चेत असतो. खरं तर गेल्या काही वर्षांत शाहरुखचे चित्रपट बॉक्स ऑफिसवर फारशी जादू दाखवू शकलेले नाहीत; पण तरीदेखील शाहरुखचं आकर्षण कायम आहे. लवकरच शाहरुख खानचा 'पठाण' हा चित्रपट रिलीज होणार आहे. या चित्रपटाचा ट्रेलर आणि गाणी यापूर्वीच चर्चेत आली आहेत. या चित्रपटातल्या गाण्याच्या अनुषंगाने काही वादही निर्माण झाले होते. त्यामुळेदेखील शाहरुख खान चर्चेत होता. आता शाहरुखची एका वेगळ्याच कारणासाठी चर्चा सुरू आहे. शाहरुख खान नुकताच एका सोहळ्यात सहभागी झाला होता. त्या वेळी त्याच्या हातातलं घड्याळ हा चर्चेचा विषय ठरला. हे घड्याळ खूपच महाग असल्याची चर्चा त्याच्या चाहत्यांमध्ये सुरू आहे. सोशल मीडियावर या घड्याळाच्या अनुषंगाने नेटकऱ्यांनी कमेंट्स केल्या आहेत.
बॉलिवूड स्टार शाहरुख खान सध्या 'पठाण' चित्रपटामुळे जोरदार चर्चेत आहे. येत्या 25 जानेवारीला हा चित्रपट रिलीज होत आहे. या चित्रपटाच्या नुकत्याच रिलीज झालेल्या ट्रेलरने सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे. या चित्रपटातली गाणी आणि अॅक्शन जोरदार चर्चेत आहे. पठाण चित्रपटातला शाहरुखचा लूक आणि कपड्यांचं विशेष कौतुक होत आहे. शाहरुखला महागडी घड्याळं वापरण्याचा छंद आहे. शाहरुख खान नुकताच इंटरनॅशनल लीग टी-20च्या उद्घाटन समारंभात सहभागी झाला होता. त्या वेळी त्याच्या हातात असलेललं घड्याळ चर्चेचा विषय ठरलं. या समारंभावेळी शाहरुखच्या लूकऐवजी त्याच्या घड्याळाची जोरदार चर्चा झाली. हे घड्याळ जितकं सुंदर आहे, तितकचं महागडंदेखील आहे. शाहरुखच्या एका चाहत्याने या घड्याळाची किंमत नेमकी किती आहे, हेदेखील शोधून काढलं आहे.
हेही वाचा - 'मी शाहरुखबरोबर काम केलंय'; प्राजक्ता माळीनं सांगितला कोणाला माहिती नसलेला किस्सा
The brand #AudemarsPiguet watch which @iamsrk is wearing is worth rupees 4,74,47,984.00 😱😱 4Crore 74Laks 47Thounds Rupees. 😮 pic.twitter.com/lSgK8Ld5oO
— Shahebaz (@Shahebaz4Srk) January 16, 2023
शाहरुख खानने घातलेल्या घड्याळाची किंमत समजताच त्याच्या चाहत्यांना आश्चर्याचा धक्का बसला आहे. युझर्सनी सोशल मीडियावर घड्याळाशी संबंधित पोस्टवर कमेंट्स केल्या आहेत. त्यात एक युजर म्हणते, 'मी या घड्याळाची 40 वी प्रत सरोजनीकडून 400 रुपयांत विकत घेईन'. दुसऱ्या एका युझरने कमेंट करताना 'वेळ तर तीच दिसते, मग स्पेशल ते काय', असा प्रश्न उपस्थित केला आहे. दुसरीकडे काही युझर्सनी शाहरुखच्या या महागड्या आणि सुंदर घड्याळाची प्रशंसा केली आहे.
शाहरुखचं हे घड्याळ ऑडेमार्स पीगेट ब्रँडचं आहे. या ब्रँडच्या मॉडेलचं नाव रॉयल ओक पर्च्युअल कॅलेंडर असं आहे. या घड्याळाचं बाजारमूल्य सुमारे 4 कोटी 74 लाख रुपये असल्याचं सांगितलं जात आहे. शाहरुखचं हे चार कोटींचं घड्याळ सध्या जोरदार चर्चेचा विषय ठरला आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Bollywood, Bollywood actor, Bollywood News