S M L

शूटिंगदरम्यान कोसळलं छत, थोडक्यात वाचला शाहरूख

आनंद एल राय यांच्या सिनेमाचं शूटिंग सुरू असताना सेटवर सीलिंगचा मोठासा भाग कोसळला आणि यामध्ये दोन क्रु मेंमबर सुद्धा जखमी झालेत. जखमींना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आलं.

Sonali Deshpande | Updated On: May 31, 2017 04:50 PM IST

शूटिंगदरम्यान कोसळलं छत, थोडक्यात वाचला शाहरूख

31 मे : सिनेमाच्या शूटिंगदरम्यान सेटवर झालेल्या अपघातात बॉलिवूडचा किंग खान थोडक्यात बचावलाय.आनंद एल राय यांच्या सिनेमाचं शूटिंग सुरू असताना सेटवर सीलिंगचा मोठासा भाग कोसळला आणि यामध्ये दोन क्रु मेंमबर सुद्धा जखमी झालेत. जखमींना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आलं.

मुंबईतील फिल्मसिटीमध्ये या सिनेमाचा सेट उभारण्यात आला होता.सेटवर घडलेल्या अपघातात किंग खान जरी बचावला असला तरी सिनेमाचं शूटिंग थांबवण्यात आलंय.

या सिनेमात शाहरूखसोबत कतरिना कैफ आणि अनुष्का शर्मा आहेत. 'जब तक है जान'नंतर पुन्हा एकदा ते एकत्र येतायत.  किंग खान यात बुटक्या माणसाची व्यक्तिरेखा साकारतोय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: May 31, 2017 04:50 PM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close