Home /News /entertainment /

शाहरूखच्या लेकीचे ग्लॅमरस PHOTO, पाहून तुम्हीही म्हणाल ही तर 'आयलँड गर्ल'

शाहरूखच्या लेकीचे ग्लॅमरस PHOTO, पाहून तुम्हीही म्हणाल ही तर 'आयलँड गर्ल'

सुहानाने आपल्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून आपले दोन फोटो शेअर केले आहेत, यात तिचा ग्लॅमरस लूक दिसत आहे.

  मुंबई, 07 सप्टेंबर : बॉलिवूड सुपरस्टार शाहरुख खानची मुलगी सुहाना खान ही एक 'आयलँड गर्ल' आहे हे तिने आपल्या नुकत्याच शेअर केलेल्या सोशल मीडिया पोस्टच्या माध्यमातून सिद्ध केले आहे. सुहानाने आपल्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून आपले दोन फोटो शेअर केले आहेत, ज्यात ती दगडांवर बसलेली दिसत आहे. फोटो शेअर करताना यावर तिने आयलँड गर्ल" असे कॅप्शन दिले आहे. पहिला फोटो शॉर्ट मोशन पिक्चर असून त्यात सुहाना दगडांवर बसलेली दिसत आहे. ग्लॅमरस फोटोमध्ये तिने काळा-पांढरा रंगाचा स्कर्ट आणि वन-शोल्डर असलेला काळा टॉप घातला आहे. दुसरा फोटो एक सेल्फी असून तिच्या चेहऱ्याचा क्लोजअप शॉट आहे. सुहानाचा हा नो मेक-अप लूक आहे. हे फोटो कुठे घेतले आहे हे स्पष्ट नसले तरी ते अलिबाग येथील असल्याचे दिसून येते. वाचा-वेब सीरिज क्वीन राधिका आपटेच्या 5 अवतारांनी जिंकलं प्रेक्षकांंचं हृदय
   
   
   
   
  View this post on Instagram
   
   
   

  islandgirl😜

  A post shared by Suhana Khan (@suhanakhan2) on

  वाचा-PHOTOS : गुलाबी बिकिनीमध्ये स्वीमिंग पुलमध्ये पुस्तक वाचताना दिसली सारा अली खान सुहाना न्यूयॉर्कमध्ये फिल्ममेकिंगचा अभ्यास करत आहे. सध्या ती मुंबईत आपल्या कुटुंबासमवेत वेळ घालवत आहे. सुहाना सोशल मीडियावर सतत वेगवेगळ्या कारणांमुळे चर्चेत असते. तिने शेअर केलेल्या फोटो किंवा व्हिडीओ मधून ती एका बॉलीवूड अभिनेत्री सारखीच वाटते. तिचे सोशल मीडिया वरील फॅन फॉलोइंग बघता ती तरुणांमध्ये फारच प्रसिद्ध असल्याचे समजते. वाचा-पार्कात व्यायाम करणाऱ्या अभिनेत्रीच्या कपड्यांवरुन भडकली काँग्रेस कार्यकर्ता यापूर्वी शाहरुखने सुहानाच्या अभिनेत्री होऊ इच्छित असल्याबद्दल खुलासा केला होता.त्यावेळी सुपरस्टारने म्हटले होते कि, "सुहानाला अभिनेत्री व्हायचं आहे. मला तिच्यातला हा उत्साह दिसतो. स्टेजवर ती खूप चांगली आहे, मी तिचे परफॉर्मन्स पाहिले आहेत. पण माझा मुद्दा अगदी सोपा आहे - तुम्हाला काहीही करण्यापूर्वी आपले शिक्षण पूर्ण करणे आवश्यक आहे. फक्त ही एकच गोष्ट मी माझ्या मुलांना सांगितली आहे. अन्यथा ते चित्रपटसृष्टीत काम करण्यास मोकळे आहेत, नुसतं चित्रपटसृष्टीत राहून मनाला वाटेल ते करू नका. त्यांना जे काही करायचे आहे त्याला माझा पाठिंबा असेल. याआधी संजय लीला भन्साळी सुहानाला लॉंच करणार असल्याची बातमी चर्चेत होती. शाहरुखनेही सुहानाला मोठ्या दिग्दर्शकाने लॉंच करावे अशी इच्छा व्यक्त केली होती.
  Published by:Priyanka Gawde
  First published:

  Tags: Shahrukh khan, Suhana khan

  पुढील बातम्या