VIDEO 'जय हो' नंतर 'जय हिंद इंडिया' : रेहमाननं रचलं हॉकी वर्ल्डकपसाठीचं नवं गाणं

यंदाच्या हॉकी वर्ल्ड कपसाठी एक गाणं तयार करण्यात आलं आहे. प्रसिद्ध संगीतकार ए.आर. रेहमानने हे गाणं केलं आहे. त्याचा टीझर नुकताच रिलिज करण्यात आला आहे. शाहरुख आणि स्वतः रेहमान यांचं या गाण्यात दर्शन होणार आहे.. पाहा एक झलक.

News18 Lokmat | Updated On: Nov 19, 2018 03:26 PM IST

VIDEO 'जय हो' नंतर 'जय हिंद इंडिया' : रेहमाननं रचलं हॉकी वर्ल्डकपसाठीचं नवं गाणं

भारताची ओळख असलेल्या हॉकीच्या वर्ल्ड कपसाठी एक गाण करण्यात आलं आहे. त्या गाण्याचा टीझर नुकताच रिलिज करण्यात आला आहे. प्रसिद्ध संगीतकार ए आर रेहमानने हे गाणं केलं आहे. हॉकी वर्ल्ड कप 2018 यंदा ओडिसामध्ये होणार आहे.

या गाण्याच्या टीझरमध्ये हॉकीच्या खेळाडूंबरोबर अभिनेता शाहरुख खान आणि गायक ए आर रेहमानसुद्धा दिसणार आहे. टीझर  पाहता या गाण्यामध्ये ओडिसाच्या संस्कृतीची एक झलक पहायला मिळते. टीझरबाबत एआर रेहमानने ट्विटरवरून सांगितले आहे


Loading...जय हिंद इंडिया असे गाण्याचे बोल आहेत. प्रसिद्ध संगीतकार एआर रेहमाननी खूप सुंदर गाण केलं आहे. 46 सेकेंदाच्या टीझरमध्ये भारताचे हॉकी खेळाडू आणि शाहरूख खान दिसत आहे. ओडिसाच्या संस्कृतीचा उल्लेख यात करण्यात आला आहे.

येत्या 28 नोव्हेंबरपासून भूवनेश्वरच्या कलिंगा स्टेडिअममध्ये हॉकी वर्ल्ड कप सुरू होणार आहे. हॉकीच्या ओपनींग कार्यक्रमात एआर रेहमान सहाभाग घेणार असून बॉलिवूडमधील दिग्गज कलाकारांची उपस्थिती असणार  आहे. पहिल्या दिवशी भारत विरूद्ध आफ्रिका असा सामना असणार आहे. यासोबतच बेल्जिअम आणि कॅनडाच्या टीम देखील असणार आहेत. हॉकी वर्ल्ड कप 2018 ची फाईनल मॅच 16 डिसेंबरला होईल.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Nov 19, 2018 03:24 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...