Home /News /entertainment /

सेजल शर्मा आत्महत्या प्रकरणात नवा ट्वीस्ट, मित्रानं केला मोठा गौप्यस्फोट

सेजल शर्मा आत्महत्या प्रकरणात नवा ट्वीस्ट, मित्रानं केला मोठा गौप्यस्फोट

सेजलचा जवळचा मित्र आणि को-स्टार निर्भय शुक्लानं तिच्या आत्महत्येबाबत आता नवा खुलासा केला आहे.

  मुंबई, 25 जानेवारी : स्टार प्लस वाहिनीवरील 'दिल तो हॅप्पी है'या मालिकेतील प्रसिद्ध अभिनेत्री सेजल शर्मा हिने आपल्या राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. नैराश्याला कंटाळून आपण आत्महत्या करत असल्याचं तिनं सुसाईड नोटमध्ये लिहिलं होतं. मुंबई उपनगरातील मिरा रोड पूर्व भागातील शिवार गार्डन परिसरात रॉयल नेस्ट या इमारतीमध्ये गेल्या काही काळापासून सेजल शर्मा आपल्या मैत्रिणीसोबत राहत होती. सेजलनं तिच्या सुसाइड नोटमध्ये नैराश्याला कंटाळून आत्महत्या करत असल्याचं म्हटलं असलं तरी या प्रकरणामध्ये नवा ट्वीस्ट आला आहे. तिचा जवळचा मित्र आणि को-स्टार निर्भय शुक्लानं तिच्या आत्महत्येबाबत आता नवा खुलासा केला आहे. स्पॉटबॉय-ईला नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत निर्भय म्हणाला, सेजल तिच्या वडीलांची तब्येत ठिक नसल्यानं मागच्या काही काळापासून नैराश्यग्रस्त होती. मी जेव्हा 15 नोव्हेंबरला तिला मेसेज केला होता. त्यावेळी तिनं मला वडीलांच्या मेडिकल इमर्जन्सीसाठी उदयपूरला जात असल्याचं सांगितलं होतं. त्यावेळी तिच्या वडीलांना हार्ट अ‍ॅटॅक अल्याचंही सांगितलं होतं. कोण आहे नवं इंटरनेट सेन्सेशन बाबा जॅक्सन? 'स्ट्रीट डान्सर'च्या टीमलाही दिला झटका
  निर्भय पुढे म्हणाला, सेजलच्या वडीलांची तब्येत मागच्या काही काळापासून ठिक नव्हती. त्यांना कॅन्सर झाला होता. अशात त्यांना हार्ट अ‍ॅटॅक आल्यानं सेजल मानसिकरित्या खचली असावी. मी तिच्या संपर्कात होतो. त्यावेळी ती ठिक असल्याचं सांगत असे. पण ती ठिक नव्हती. तिचं डिप्रेशन वाढत गेलं. दरम्यानच्या काळात मी कामत बीझी होतो. जानेवारीमध्येच आमचं शेवटचं बोलणं झालं होतं. त्यावेळी आम्ही एकमेकांना भेटायचं ठरवलं होतं. यावेळी ती आमची मैत्रीण आणि को-स्टार आयशा कदुस्करला सुद्धा भेटणार होती. सनी लिओनीसोबत रोमान्स करताना दिसणार Bigg boss 13चा हा स्पर्धक
  View this post on Instagram

  “ , , , , ’ , ’ ” . . RIP Sejal.

  A post shared by Nirbhay (@nirbhay_shuklaa) on

  सेजल 'दिल तो हॅप्पी है' या मालिकेत मुख्य भूमिकेत दिसली होती. ऑगस्ट 2019 पासून ही मालिका बंद झाली. त्यानंतर तिच्याकडे काम नव्हतं तसेच तिचे वडीलही आजारी होते. त्यामुळे सेजल खूप डिप्रेशनमध्ये होती. 'आपण गेल्या दीड महिन्यापासून नैराश्यात असून आत्महत्या करत आहोत, त्याकरिता कोणालाही जबाबदार ठरवू नये' असं तिने सुसाईड नोटमध्ये नमूद केलं आहे. अनेक संकटांवर मात करुन हे सेलिब्रेटी आले एकत्र, रिअल लाइफ फिल्मी लव्हस्टोरी
  काही दिवसांपूर्वी टीव्ही अभिनेता कुशल पंजाबीनं नैराश्यग्रस्त अवस्थेत आत्महत्या केली होती त्यानंतर आता सेजलनंही नैराश्यात टोकाचं पाऊल उचलल्यानं त्यांच्यासोबत काम केलेल्या इतर कलाकारांना मोठा धक्का बसला आहे. सेजलच्या आत्महत्येनंतर ग्लॅमरस दुनियेतलं हे धक्कादायक सत्य समोर आलं आहे. हॉलिवूडनंतर इथेही आलं सोशल मीडिया फोटो चॅलेंज; आयुष्मान, जॅकलीननंतर सई सामील
  Published by:Megha Jethe
  First published:

  Tags: Bollywood

  पुढील बातम्या