बलात्काराच्या आरोपाखाली प्रसिद्ध दिग्दर्शकाला अटक, अनेक महिन्यांपासून करत होता हे काम

बलात्काराच्या आरोपाखाली प्रसिद्ध दिग्दर्शकाला अटक, अनेक महिन्यांपासून करत होता हे काम

या दिग्दर्शकाला पोलिसांनी अटक केली असून त्यानं दिलेल्या माहितीमध्ये अनेक धक्कादायक खुलासे झाले आहेत.

  • Share this:

मुंबई, 19 ऑक्टोबर : मागच्या वर्षीपासून सुरू झालेल्या 'मी टू' चळवळीनं अख्खं बॉलिवूड ढवळून निघालं. त्यानंतर आता साउथ मधील प्रसिद्ध दिग्दर्शक आणि नाट्य कलाकार सुदीप्तो चटर्जी यांना बलात्काराच्या आरोपाखाली अटक करण्यात आली आहे. त्यांच्यावर आरोप आहे की, त्यांनी नाटकाच्या ग्रुपमधील एका विद्यार्थीनीवर अनेक महिने बलात्कार केला. या प्रकरणामुळे सुदीप्तो यांना अटक करण्यात आली आहे. याबाबत आरोपीनं पोलिसांना दिलेल्या माहितीमध्ये अनेक धक्कादायक खुलासे झाले आहेत. तर दुसरीकडे सुदीप्तो यांनी आपला गुन्हा कबूल केला आहे.

बुधवारी रात्री हे सर्व प्रकरण उघडकीस आलं. पीडितेनं तिच्यावर झालेल्या अत्याचारांबद्दल तक्रार दाखल करण्यासाठी सोशल नेटवर्किंग साइटचा आधार घेतला. या मुलीनं फेसबुकवर एक भली मोठी पोस्ट लिहून यामध्ये सर्व गोष्टींचा सविस्तर उल्लेख केला होता. या विद्यार्थीनीनं सांगितलं की नाटकांच्या रिहर्सल दरम्यान तिला सुदीप्तो यांच्याकडून लैंगिक अत्याचार सहन करावे लागले.

पहिल्यांदाच एक्सपर्ट सुद्धा झाले फेल, KBCच्या प्रश्नाचं उत्तर Google कडेही नाही

या प्रकरणी लगेचच कारवाई करत पोलिसांनी सुदीप्तो यांना अटक केली. कोलकाता पोलिसांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडितेनं सांगितलं की, सुदीप्तो यांनी तिला अभिनया दरम्यान श्वास घेण्याची टेक्निक शिकवण्याच्या बहाणा करुन मागच्या वर्षीच्या डिसेंबर पासून आतापर्यंत अनेक वेळा तिच्यावर बलात्कार केला. या माहितीवरुन आम्ही आरोपीला अटक केली असून त्यांची पुढील चौकशी सुरू आहे.

चाहत्यांसाठी आनंदाची बातमी, बिग बी अमिताभ बच्चन यांना रुग्णालयातून डिस्चार्ज

पीडितेनं शुक्रवारी सकाळी फूलबागन पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. त्यानंतर पोलिसांनी शुक्रवारी संध्याकाळी फूलबागन येथील घरुन सुदीप्तो यांना अटक केली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपी दिग्दर्शक सुदीप्तो चटर्जी यांनी आपला गुन्हा कबूल केला आहे. याशिवाय या नाटकाच्या ग्रुपमधील आणखी एका महिलेनं सुदीप्तो यांच्या विरोधात तक्रार दाखल केली आहे.

'या' आहेत बॉलिवूडच्या सर्वात श्रीमंत अभिनेत्री, संपत्ती ऐकून व्हाल थक्क!

===========================================================

पाऊस नाही शरद पवार बरसले, भरपावसातलं UNCUT भाषण

First published: October 19, 2019, 1:51 PM IST
Tags: Bollywood

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading