मुंबई, 11 एप्रिल : एखाद्या नामांकित कॉलेजमधून डीग्री घेऊन एक चांगली नोकरी शोधून पुढील आयुष्य आरामात काढण्याचा प्रत्येक मध्यमवर्गीय युवकाचं स्वप्न असतं. त्यात जरी सरकारी नोकरी मिळाली तर आयुष्यभराची खात्री असते. मात्र हे स्वप्न पाहाणं जेवढं सोप्पं आहे. तेवढंच ते सत्यात उतरवणं कठीण असतं. यासाठी सध्याची तरुण पीढी काय काय करतात याच आढावा दिग्दर्शक अश्विनी चौधरी यांच्या 'सेटर्स'(Setters) सिनेमात घेण्यात आला आहे. नुकताच या सिनेमाचा ट्रेलर रिलीज झाला. तरुण पीढीच्या अपेक्षा, महत्वाकांक्षा, निराशा आणि संघर्षासोबतच देशात आकार घेत असलेल्या शिक्षण आणि रोजगार क्षेत्रातील माफिया गँगचं चित्रण या ट्रेलर मध्ये पाहायाला मिळत आहे.
'सटर्स'ची कथा शिक्षण आणि रोजगार क्षेत्रात होत असलेल्या भ्रष्टाचाराभोवती फिरते. एक अशी माफिया गँग जी युवकांच्या स्वप्नांशी खेळते. ज्यामुळे अनेकांचं आयुष्य खराब होतं. यशासाठी कोणताही शॉर्टकट नाही आणि असा कोणत्याही शॉर्टकटमुळे आपलं आयुष्य सोप्पं नाही तर अधिकाधिक कठीण होत जातं. हे सेटर्सचा ट्रेलर पाहिल्यावर जाणवतं. सेटर्सचा हा ट्रेलर 11 एप्रिलला रिलीज झाला असून त्याला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. तसंच हा ट्रेलर सध्या युट्युबवरही ट्रेंड होत आहे.
वाराणसीमधील एक माफिया गँग हे एग्झाम रॅकेट चालवत आहे. शैक्षणिक क्षेत्रातील त्रुटींचा फायदा घेत हे लोक पेपर सेट करण्याच काम करतात. सरकारी नोकरीसाठी द्याव्या लागणाऱ्या परिक्षांमध्ये खऱ्या विद्यार्थ्याच्या जागी नकली विद्यार्थी पाठवून हे लोक खूप पैसा कमवतात. मात्र त्यांच्या या कामात अडथळा तेव्हा येतो जेव्हा एक प्रामाणिक पोलिस ऑफिसर त्यांचं हे रॅकेट उधळून लावायला सुरुवात करतो. या सिनेमाचं शूटिंग वाराणसी, दिल्ली, जयपूर आणि वाराणसी या ठिकाणी झालं आहे. दिग्गर्शिक अश्विन यांच्या मते हा सिनेमा सत्य घटनांवर बेतलेला असून हा सिनेमा शैक्षणिक क्षेत्रतील भ्रष्टाचार पद्धती प्रेक्षकांसमोर मांडतो. या सिनेमात बॉलिवूडमधील तगडी स्टारकास्ट पाहायला मिळणार आहे. अभिनेता आफताब शिवदसानी पोलिस ऑफिसरच्या भूमिकेत असून श्रेयस तळपदे, पवन मल्होत्रा, विजय राज, सोनाली सेहगल, इशिता दत्ता यांच्याही प्रमुख भूमिका आहेत. हा सिनेमा 3 मे ला सिनेमागृहात प्रदर्शित होणार आहे.