PHOTOS : झी पुरस्कारांच्या नामांकन पार्टीत पाठकबाईंचा सुंदर अंदाज पहा

PHOTOS : झी पुरस्कारांच्या नामांकन पार्टीत पाठकबाईंचा सुंदर अंदाज पहा

झी मराठीवरील मालिकांचा आणि कलाकारांचा गौरव करणारा सोहळा म्हणजे झी मराठी अॅवॉर्ड्स. दरवर्षी अतिशय देखण्या आणि दिमाखदार पद्धतीने हा सोहळा मोठ्या थाटामाटात पार पडतो. या मुख्य सोहळ्याइतकाच रंगतदार आणि देखणा असतो तो नामांकनाचा सोहळा. त्याचीच एक झलक -

  • Share this:

झी मराठीवरील मालिकांचा आणि कलाकारांचा गौरव करणारा सोहळा म्हणजे झी मराठी अॅवॉर्ड्स. दरवर्षी अतिशय देखण्या आणि दिमाखदार पद्धतीने हा सोहळा मोठ्या थाटामाटात पार पडतो. कलाकारांचे दिलखेचक परफॉरमन्स, विनोदी स्किटस् आणि सोबतीला कोणता कलाकार, कोणती जोडी, कोणती मालिका, कोणतं कुटुंब सर्वोत्कृष्ट ठरेल याची लागलेली उत्सुकता अशा वातावरणात हा कार्यक्रम रंगतो.

झी मराठीवरील मालिकांचा आणि कलाकारांचा गौरव करणारा सोहळा म्हणजे झी मराठी अॅवॉर्ड्स. दरवर्षी
अतिशय देखण्या आणि दिमाखदार पद्धतीने हा सोहळा मोठ्या थाटामाटात पार पडतो. कलाकारांचे दिलखेचक
परफॉरमन्स, विनोदी स्किटस् आणि सोबतीला कोणता कलाकार, कोणती जोडी, कोणती मालिका, कोणतं कुटुंब
सर्वोत्कृष्ट ठरेल याची लागलेली उत्सुकता अशा वातावरणात हा कार्यक्रम रंगतो.

याची नॉमिनेशन पार्टी गुरुवारी मुंबईत पार पडली. या पार्टीला चंदेरी दुनियेतील लखलखते तारे अवतरले होते.

याची नॉमिनेशन पार्टी गुरुवारी मुंबईत पार पडली. या पार्टीला चंदेरी दुनियेतील लखलखते तारे अवतरले होते.

यावेळी ईशा म्हणजेच गायत्री छान नटून आली होती. संपूर्ण महाराष्ट्रातील तमाम प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य करणाऱ्या लाडक्या कलाकारांनी निऑन आणि पॉप या थिम अनुसार तयार होऊन या पार्टीला चार चांद लावले.

यावेळी ईशा म्हणजेच गायत्री छान नटून आली होती. संपूर्ण महाराष्ट्रातील तमाम प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य करणाऱ्या लाडक्या कलाकारांनी निऑन आणि पॉप या थिम अनुसार तयार होऊन या पार्टीला चार चांद लावले.

'तुझ्यात जीव रंगला'च्या पाठकबाईंचा वेगळाच अंदाज या पार्टीत पाहायला मिळाला. यंदा तुझ्यात जीव रंगला, माझ्या नवऱ्याची बायको, जागो मोहन प्यारे, लागिरं झालं जी, बाजी, तुला पाहते रे या मालिकांमध्ये टफ फाइट बघायला मिळणार आहे.

लोकप्रिय जोडी गुरू आणि शनायाही वेगळ्याच रूपात होती. विशेषत: नवी शनाया म्हणजे ईशा केसकर तर ओळखूच येत नव्हती.

लोकप्रिय जोडी गुरू आणि शनायाही वेगळ्याच रूपात होती. विशेषत: नवी शनाया म्हणजे ईशा केसकर तर ओळखूच येत नव्हती.

सर्वोत्कृष्ट अभिनेता, सर्वोत्कृष्ट अभिनेत्री, सर्वोत्कृष्ट बहीण- भाऊ, सर्वोत्कृष्ट जोडी, सर्वोत्कृष्ट कुटुंब, सर्वोत्कृष्ट मालिका, सर्वोत्कृष्ट सूत्रसंचालक या आणि अशा अनेक विविध श्रेणीत यावेळी नामांकनं जाहीर करण्यात आली.

सर्वोत्कृष्ट अभिनेता, सर्वोत्कृष्ट अभिनेत्री, सर्वोत्कृष्ट बहीण-
भाऊ, सर्वोत्कृष्ट जोडी, सर्वोत्कृष्ट कुटुंब, सर्वोत्कृष्ट मालिका, सर्वोत्कृष्ट सूत्रसंचालक या आणि अशा अनेक
विविध श्रेणीत यावेळी नामांकनं जाहीर करण्यात आली.

पार्टीत सर्वच सेलिब्रिटींनी भरपूर धमाल तर केलीच पण आता प्रेक्षकांची सर्वात आवडती मालिका आणि कलाकार कोण आहेत हे लवकर कळेल.

पार्टीत सर्वच
सेलिब्रिटींनी भरपूर धमाल तर केलीच पण आता प्रेक्षकांची सर्वात आवडती मालिका आणि कलाकार कोण आहेत
हे लवकर कळेल.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Oct 5, 2018 04:19 PM IST

ताज्या बातम्या