News18 Lokmat

...आणि 'बाळूमामा'च्या मेंढ्या आल्या परत

कलर्स मराठीवरील अस्सल पाहुणे इरसाल नमुने कार्यक्रमामध्ये या आठवड्यामध्ये 'बाळूमामाच्या नावानं चांगभलं'मधील कलाकारांनी हजेरी लावली आहे.

News18 Lokmat | Updated On: Dec 6, 2018 01:24 PM IST

...आणि 'बाळूमामा'च्या मेंढ्या आल्या परत

मुंबई, 6 डिसेंबर : कलर्स मराठीवरील अस्सल पाहुणे इरसाल नमुने कार्यक्रमामध्ये या आठवड्यामध्ये 'बाळूमामाच्या नावानं चांगभलं'मधील कलाकारांनी हजेरी लावली आहे. बाळूमामाच्या नावानं चांगभलं या मालिकेने अल्पावधीतच प्रेक्षकांची पसंती मिळवली.


कायर्क्रमामध्ये मकरंद यांनी बाळूची भूमिका साकारणाऱ्या समर्थला विचारलं, मालिकेमध्ये तुझी निवड झाली तेव्हा घरच्यांची काय प्रतिक्रिया होती ? त्यावर समर्थ म्हणाला बाबांना आवडलं नाही आणि ते म्हणाले नको करू. पण माझ्या मामांनी मला प्रोत्साहन दिले. पण यानंतर समर्थला अश्रू अनावर झाले.


तसंच मालिकेच्या सेटवर कलाकारांची प्राण्यांशी चांगलीच मैत्री झाली आहे. मालिकेमध्ये सत्यवाची भूमिका साकारणारी साजरी हिने प्रत्येक प्राण्याला एक खास नाव ठेवलं आहे. गाईचं नाव तांबडी आणि कपिला तांबडीचं वासरू आहे जे खूपच गोंडस आहे. त्याचं नाव चिंगू ठेवलं आहे. तसंच घोड्याचं नाव राजा आणि घोडीचं परी नाव आहे. गाढव देखील आहे.  त्याचं नाव सगळ्यात खास आहे गधा भाई.

Loading...


बाळूमामाच्या नावानं चांगभलं या मालिकेच्या शूट दरम्यान आलेला एक अद्भुत किस्सा देखील यावेळेस सांगितला. अचानक शूटच्या दरम्यान मेंढ्या गायब झाल्या.  खूप शोधल्या तरी त्या मिळाल्या नाहीत. पण दुसऱ्या दिवशी मात्र त्या सगळ्या मेंढ्या सेटवर परतल्या.  या घटनेनंतर कळलं की, जंगलामध्ये ज्या ठिकाणी या मेंढ्या होत्या त्या परिसरामध्ये बिबट्याचा वावर असतो. परंतु त्या बाळूमामाच्या मेंढ्या असल्याने त्यांना काहीच झालं नाही. आणि त्या सुखरूप परतल्या.


त्यावर संतोष अयाचित म्हणाले, ज्या मामांनी आम्हाला मेंढ्या आणि इतर प्राणी पाठवले त्यांना मी फोन केला आणि त्यांना सांगितलं की, आम्ही मेंढ्याची काळजी नाही घेऊ शकलो त्यावर ते म्हणाले, 'काही काळजी करू नका. त्या बाळूमामांच्या मेंढ्या आहेत.  त्यांना हात लावणं इतकं सोपं नाही.' हा खरोखरच एक चमत्कार आहे असं म्हणावं लागेल


याचबरोबर स्वप्नील जोशी आणि मुक्ता बर्वे यांनीही मकरंदच्या प्रश्नांना उत्तरं दिली आणि प्रेक्षकांना माहिती नसलेले किस्से सांगितले.नवरा असावा कसा, सांगतेय हर्षदा खानविलकर!

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Dec 6, 2018 01:24 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...