Home /News /entertainment /

'बधाई हो'च्या सिक्वेलमध्ये आयुष्मानच्या जागी 'राजकुमार राव', तर लीड रोलमध्ये दिसणार ही अभिनेत्री

'बधाई हो'च्या सिक्वेलमध्ये आयुष्मानच्या जागी 'राजकुमार राव', तर लीड रोलमध्ये दिसणार ही अभिनेत्री

'बधाई हो' (Badhai Ho) मधील मुख्य भूमिका साकारणारे आयुष्मान खुराना आणि सानया मल्होत्रा या सिनेमामध्ये नसणार आहेत. तर या दोघांच्या जागी आणखी एक भन्नाट जोडी असणार आहे.

    मुंबई, 09 मार्च : 2018 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘बधाई हो’ (Badhai Ho) ने प्रेक्षकांची मनं जिंकली होती. अनेक वर्षांनी अशा कॉमेडी मुव्हीचा आनंद प्रेक्षकांनी घेतला होता. आयुष्मान खुराना आणि सायना मल्होत्रा या जोडीच्या रोमान्सपेक्षा नीना गुप्ता आणि गजराज राव यांचा रोमँटिक अंदाज जास्त गाजला. आयुष्मानच्या इतर चित्रपटांप्रमाणेच यामधून सुद्धा एक दैंनदिन जीवनाशी निगडीत संदेश देण्याचा प्रयत्न केला होता. या चित्रपटातील गाणी सुद्धा थिरकायला लावतात. एकंदरित हा सिनेमा म्हणजे ‘एंटरटेनमेंट’चं एक पूर्ण पॅकेज होता. तर आता या सिनेमाचा सिक्वेल प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. मात्र यातील ट्विस्ट म्हणजे बधाई हो मधील मुख्य भूमिका साकारणारे आयुष्मान खुराना आणि सानया मल्होत्रा या सिनेमामध्ये नसणार आहेत. तर या दोघांच्या जागी आणखी एक भन्नाट जोडी असणार आहे. (हे वाचा- स्विमिंग सूटमधील दीपिकाचे फोटो पाहून चाहते म्हणाले, ‘सर्वात HOT फोटोशूट...’) ‘बधाई हो’च्या सिक्वेलमध्ये अभिनेता राजकुमार राव दिसणार आहे. तर त्याच्यासोबत भूमी पेडणेकर स्क्रीन शेअर करणार आहे. दोघेही तोडीस तोड कलाकार असल्यामुळे हा चित्रपट देखील ‘बधाई हो’ प्रमाणेच प्रेक्षकांच्या पसंतीस उतरेल अशी अपेक्षा आहे. या चित्रपटामध्ये काम करण्यास राजकुमार आणि भूमी दोघांनीही उत्सुकता दाखवली आहे. राजकुमार या चित्रपटात असणार आहे, हे आधीच घोषित झालं होतं. मात्र त्याच्याबरोबर भूमिच्याही नावाची वर्णी लागल्यामुळे तिचे चाहतेही खूप उत्सुक आहेत. दरम्यान ‘बधाई हो’ च्या फ्रँचायझीमध्ये काम करण्याची आधीपासून इच्छा होती अशी प्रतिक्रिया भूमीने दिली आहे. (हे वाचा-'हिरॉईन' मधील इंटिमेट सीनबद्दल करीना कपूरचा खुलासा, म्हणाली...) ‘बधाई हो’ या चित्रपटाची आणखी एक गंमत म्हणजे या सिनेमाचं नाव ‘बधाई दो’ असणार आहे. या चित्रपटात राजकुमार राव एका पोलिसाच्या भूमिकेत दिसणार आहे, तर भूमी पीटी शिक्षकेच्या भूमिकेत दिसेल. दरम्यान या चित्रपटाचं शूटिंग जूनमध्ये सुरू होणार असून 2021 मध्ये हा सिनेमा प्रदर्शित होण्याची शक्यता आहे.
    Published by:Janhavi Bhatkar
    First published:

    Tags: Rajkumar rao

    पुढील बातम्या