S M L

ज्येष्ठ नाट्यदिग्दर्शक दिलीप कोल्हटकर यांचं निधन

उत्तम दिग्दर्शक, प्रकाश योजनाकार, अभिनेते, ज्येष्ठ नाट्यदिग्दर्शक दिलीप कोल्हटकर यांचं निधन झालं आहे. रात्री उशीरा दीनानाथ रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

Renuka Dhaybar | Updated On: May 4, 2018 12:17 PM IST

ज्येष्ठ नाट्यदिग्दर्शक दिलीप कोल्हटकर यांचं निधन

04 मे : उत्तम दिग्दर्शक, प्रकाश योजनाकार, अभिनेते, ज्येष्ठ नाट्यदिग्दर्शक दिलीप कोल्हटकर यांचं निधन झालं आहे. रात्री उशीरा दीनानाथ रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. उद्या पुण्यात त्यांच्यावर अंत्यसंस्कार होणार आहेत. त्यांच्या जाण्याने अवघ्या कलाक्षेत्रात शोककळा पसरली आहे. काही दिवसांआधीच त्यांच्या पत्नी दिपाली कोल्हटकर यांचा संशयी मृत्यू झाला होता.

आपल्या वडिलांच्या निधनाची बातमी समजताच त्यांचा मुलगा अन्वय हा अमेरिकेहून निघाला आहे. तो आल्यानंतर उद्या त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे.

दिलीप कोल्हटकर हे हौशी आणि व्यावसायिक मराठी रंगभूमीवरील एक मोठं व्यक्तिमहत्त्व होते. त्यांनी त्यांच्या नाटकांनी प्रेक्षकांच्या मनात एक वेगळीच छाप निर्माण केली होती. प्रायोगिक नाटकांसह व्यावसायिक नाटकांचे दिग्दर्शनही त्यांनी केले होते. त्यांनी दिग्दर्शित केलेलं 'मोरुची मावशी' हे नाटक सर्वाधिक गाजलं होतं. आजही त्यांचं हे नाटक सगळ्यांच्या स्मरणात आहे.

एक यशस्वी दिग्दर्शक, अभिनेता आणि प्रकाश योजनाकार म्हणून नाट्यश्रेत्रात तसेच दिग्दर्शक म्हणून चित्रपट आणि छोट पडदा अशा मनोरंजनाच्या तिन्ही माध्यमांमध्ये वावरताना त्यांनी आपल्या कामाचा ठसा प्रत्येक ठिकाणी उमटवला.

'शेजारी शेजारी' हा अशोक सराफ आणि वर्षा उसगावकर यांचा चित्रपट कोल्हटकर यांनी दिग्दर्शित केला होता. 'आई रिटायर होते', 'उघडले स्वर्गाचे दार', 'सोनचाफा', 'दीपस्तंभ', 'छावा', 'आसू आणि हसू', 'गोड गुलाबी', अशा इत्यादी नाटकांनी त्यांनी नाटकक्षेत्रात मोठी प्रगती केली आहे. पण त्यांच्या या जाण्यांने अवघ्या नाटक क्षेत्राने मोठा कलावंत गमल्याची खंत व्यक्त करण्यात येत आहे.

Loading...
Loading...

 दिलीप कोल्हाटकर यांचा अल्पपरिचय

- सांगलीत 3 सप्टेंबर 1946 साली जन्म

- ज्येष्ठ दिग्दर्शक, व्यावसायिक कलाकार,

- बँक ऑफ बडोदातून 30 वर्षे नोकरी करून सेवानिवृत्त

- मराठी रंगभूमीवरील एक बहुपेडी व्यक्तिमत्व

- यशस्वी दिग्दर्शक, अभिनेता आणि प्रकाश योजनाकार

- शेजारी शेजारी आणि ताईच्या बांगड्या चित्रपटांचे दिग्दर्शक

- मोरुची मावशी गाजलेलं नाटक, 2 हजारांहून अधिक प्रयोग

- नाट्यदर्पण पुरस्कार बारावेळा मिळवलेले मानकरी

- महाराष्ट्र राज्य व्यावसायिक मराठी नाट्यस्पर्धेत चार वेळा राज्य पुरस्कार

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: May 4, 2018 11:14 AM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close