मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /सेजल शर्मा आत्महत्या प्रकरण : संशयाची सुई बॉयफ्रेंडवर, कुटुंबीयांची चौकशीची मागणी

सेजल शर्मा आत्महत्या प्रकरण : संशयाची सुई बॉयफ्रेंडवर, कुटुंबीयांची चौकशीची मागणी

सेजलनं आत्महत्या करण्याच्या 2 दिवस आधीपासून तिचे बॉयफ्रेंडसोबत वाद सुरू होते.

सेजलनं आत्महत्या करण्याच्या 2 दिवस आधीपासून तिचे बॉयफ्रेंडसोबत वाद सुरू होते.

सेजलनं आत्महत्या करण्याच्या 2 दिवस आधीपासून तिचे बॉयफ्रेंडसोबत वाद सुरू होते.

मुंबई, 26 जानेवारी : टीव्ही अभिनेत्री सेजल शर्मानं आपल्या राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. नैराश्याला कंटाळून आपण आत्महत्या करत असल्याचं तिनं सुसाइड नोटमध्ये लिहिलं होतं. मुंबई उपनगरातील मिरा रोड पूर्व भागातील शिवार गार्डन परिसरात रॉयल नेस्ट या इमारतीमध्ये गेल्या काही काळापासून सेजल शर्मा आपल्या मैत्रिणीसोबत राहत होती. याबाबत आता पोलिसांच्या संशयाची सुई तिच्या बॉयफ्रेंडवर जाऊन थांबली आहे.

सेजल शर्माचा बॉयफ्रेंड एक स्ट्रगलिंग मॉडेल आहे. मुंबई पोलिसांनी त्याला चौकशीसाठी मुंबईमध्ये येण्याचे आदेश दिले आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार त्यांना सेजलच्या आत्महत्येची माहिती दिल्लीतून आलेल्या एका कॉलमुळे समजली होती. हा कॉल तिचा बॉयफ्रेंड आदित्य गुज्जरनं केला होता. त्यानं मीरा रोड पोलिस स्टेशनला कॉल करुन सेजल त्याचा फोन उचलत नसल्याचं सांगत तिनं आत्महत्या केली असण्याची शक्यता वर्तवली होती. आत्महत्येपूर्वी सेजल आणि आदित्य यांच्यात फोनवर बोलणं झालं होतं. त्यामुळे या दोघांमध्ये असं काय बोलणं झालं ज्यामुळे सेजलनं एवढं टोकाचं पाऊल उचललं याचा शोध पोलिस करत आहेत.

एवढं लिफ्ट करण्याचं कारण काय? अदनानच्या पद्म पुरस्काराला मनसेचा विरोध

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सेजलची मालिका ‘दिल तो हॅप्पी है जी’ काही महिन्यांपूर्वीच संपली. त्यानंतर सेजलकडे कोणतही काम नव्हतं. ती सुरुवातीला वर्सोवामध्ये राहत असे, पण नंतर काम नाही, आर्थिक तंगीमुळे ती ऑगस्ट 2019 मध्ये काही बॅचलर्स लोकांसोबत मीरा रोडला शिफ्ट झाली. दरम्यानच्या काळात स्ट्रगलिंग अभिनेता आदित्य गुज्जार याच्याशी तिची जवळीक वाढत गेली. आदित्य मूळचा दिल्लीचा होता. पण तो सेजलसोबत मुंबईमध्ये राहत होता. सुरुवातीला वर्सोवामध्ये हे दोघंही एकत्र राहत होते. पम नंतर सेजल मीरारोडला शिफ्ट झाल्यावर आदित्य सुद्धा तिच्यासोबत या ठिकाणी शिफ्ट झाला. काही दिवसांपूर्वी सेजलनं तिच्या कुटुंबीयांशी आदित्याची ओळख करुन दिली होती.

अदनाम सामी आणि कंगना रानावतला पद्मश्री जाहीर, पाहा संपूर्ण यादी

View this post on Instagram

No filter needed clicked by @mahi.sharma1

A post shared by sezal sharma (@sezalsharma) on

सेजलच्या आई-वडीलांनी केली आदित्यच्या चौकशीची मागणी

पोलिसांनी सेजलच्या कुटुंबीयांचा आणि काही मित्राचा जबाब नोंदवून घेतल्यानंतर अंतिम संस्कारांसाठी तिची डेड बॉडी कुटुंबाच्या ताब्यात दिली. उदयपूरमध्ये सेजलवर अंतिम संस्कार करण्यात येणार आहेत. मात्र सेजलच्या कुटुंबीयांनी त्यांच्या समोरच आदित्य गुज्जरची चौकशी करण्याची मागणी केली आहे. सेजलनं आत्महत्या करण्याच्या 2 दिवस आधीपासून आदित्य आणि तिच्यात वाद सुरू होते. पोलिसांनी त्याच्याशी संपर्क करण्याचा प्रयत्न केल्यावर त्याच्या आईनं त्याचा फोन उचलला होता. त्यावेळी त्यांनी आदित्य लवकरच त्याचा जबाब पोलिसांना देईल असं आश्वासन दिलं आहे. सध्या पोलिसांनी सेजलचा फोन जप्त केला आहे मात्र त्याला पासवर्ड असल्यानं हा फोन अनलॉक करणं जमलेलं नाही. पण या फोनमधून सेजलच्या आत्महत्येचं नेमकं कारण समोर येण्याची शक्यता आहे.

नसीरुद्दीन शाहांच्या मुलीचा VIDEO आला समोर, महिला कर्मचाऱ्याच्या लगावली कानाखाली

सेजलनं लिहिली होती 7 ओळींची सुसाइड नोट

सेजलनं आत्महत्येपूर्वी 7 ओळींची सुसाइड नोट लिहिली होती. ज्यात तिनं आपण मागच्या 2 महिन्यांपासून डिप्रेशनमध्ये असल्याचा उल्लेख करत आपल्या मृत्यूला कोणालाही जबाबदार ठरवू नये असं म्हटलं होतं. आई, बाबा, भाऊ सर्वांना आपली काळजी घ्या. माझ्या या निर्णयासाठी मला माफ करा पण माझ्याकडे दुसरा कोणताच रस्ता नव्हता. मी तुम्हा सर्वांवर खूप प्रेम करते. मला माफ करा असं तिनं तिच्या सुसाइड नोटमध्ये म्हटलं होतं.

हिमेश रेशमियानं केली रश्मि देसाईची पोलखोल, घरातील सदस्यांना बसला धक्का

First published:

Tags: Bollywood