Home /News /entertainment /

BREAKING : ज्येष्ठ अभिनेत्री सीमा देव यांना अल्झायमर, मुलगा अजिंक्यने ट्वीट करून दिली माहिती

BREAKING : ज्येष्ठ अभिनेत्री सीमा देव यांना अल्झायमर, मुलगा अजिंक्यने ट्वीट करून दिली माहिती

ज्येष्ठ अभिनेत्री सीमा देव यांनी केवळ मराठीच नाही तर हिंदी सिनेसृष्टीवरही आपल्या अभिनयातून वेगळा ठसा उमटवला आहे. त्यांना अल्झायमर या आजारानं ग्रासल्याची माहिती मिळत आहे.

मुंबई, 14 ऑक्टोबर : अनेक वर्षांपासून आपल्या अभिनयानं प्रेक्षकांच्या मनात अढळ स्थान निर्माण केलेल्या आणि घराघरा पोहोचलेल्या ज्येष्ठ अभिनेत्री सीमा देव यांना मोठा आजार झाल्याची माहिती त्यांचा मुलगा अजिंक्यने ट्वीट करून दिली आहे. सीमा देव यांना अल्झायमर या दुर्धर आजारानं ग्रासलं आहे. अनेक दशकांपासून सीमा आणि रमेश देव यांनी अनेक चित्रपटांमधून रसिकांचं मनोरंजनच नाही तर घरातील प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं आहे. 'माझी आई मराठी चित्रपटसृष्टीची सीमा देव अल्झायमरने ग्रस्त आहेत. सध्या त्यांच्यावर उपचार सुरू असून आम्ही तिच्यावर खूप प्रेम करतो. त्यांची तब्येत चांगली राहावी याकरता संपूर्ण देव कुटुंबीय प्रार्थना करत आहेत, ज्या महाराष्ट्रातल्या प्रेक्षकांनी त्यांच्यावर प्रेम केलं त्यांनीही त्यांच्याकरता प्रार्थना करावी असं आवाहन अजिंक्य देव यांनी केलं आहे.' ज्येष्ठ अभिनेत्री सीमा देव यांनी केवळ मराठीच नाही तर हिंदी सिनेसृष्टीवरही आपल्या अभिनयातून वेगळा ठसा उमटवला आहे. त्यांना अल्झायमर या आजारानं ग्रासल्याची माहिती मिळत आहे. मुलगा अजिंक्य देव यांनी ट्वीट करून या संदर्भात माहिती दिली. छोट्या छोट्या गोष्टीही विसरणं; विसराळू स्वभाव नाही तर मेंदूचा गंभीर आजार सीमा देव यांनी जगाच्या पाठीवर या सिनेमातून सिनेसृष्टीत पदार्पण केलं त्यानंतर सुवासिनी, आनंद, वरदक्षिणा, कोशिश, बदला, अपराध, सर्जा अशा अनेक चित्रपटांमध्ये काम केलं आहे. जेता चित्रपटात रमेश देव आणि सीमा देव यांनी केलेलं काम तर रसिकांच्या अंगावर आजही शहारे आणतं.
First published:

पुढील बातम्या