Home /News /entertainment /

अनन्या पांडे आहे 'या' अभिनेत्याची आवडती योगा पार्टनर; नाव ऐकून तुम्हीही चकित व्हाल

अनन्या पांडे आहे 'या' अभिनेत्याची आवडती योगा पार्टनर; नाव ऐकून तुम्हीही चकित व्हाल

अभिनेत्री अनन्या पांंडे सध्या एका अभिनेत्याची आवडती योगा पार्टनर ठरत आहे. पाहा कोण आहे हा अभिनेता.

   मुंबई 29 जून: अभिनेत्री अनन्या पांडे (Ananya Panday) ही नेहमीच विविध कारणांसाठी चर्चेत असते. तर यावेळी ती एका अभिनेत्याची फेवरेट योगा पार्टनर (Yoga Partner) ही ठरली आहे. त्यामुळे अनन्या पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. यामुळे चाहत्यांमध्येही चर्चेला उधाण आलं आहे. अनन्याने या अभिनेत्यासोबत चित्रपटात काम ही केलं आहे. अनन्याचा ‘खाली पिली’ (Khali Pili) चित्रपटातील को-स्टार अभिनेता ईशान खट्टर (Ishaan Khattar) याने अनन्याला त्याची आवडती योगा पार्टनर असल्याचं म्हटलं आहे. चित्रपटातील त्यांची केमिस्ट्री प्रेक्षकांना फारच आवडली होती.

  अतिशय संस्कारी आहे रणदीप हुड्डाचा श्वान; पूजा करतानाचे फोटो पाहून चाहते अवाक्

  अभिनेता ईशान खट्टरने त्याच्या सोशल मीडिया अकाउंट वर #askmeanything हा सेशन घेतला होता. त्यात त्याला त्याच्या चाहत्यांनी अनेक प्रश्न विचारले. एका चाहत्याने विचारलं तुला कोणासोबत योगा करायला आवडतो. यावर ईशानने अनन्या पांडेचा बालपणीचा फोटो पोस्ट करत. अनन्या पांडे असं लिहिलं. त्यामुळे त्यांचे चाहते भलतेच खूश झाले आहेत. दरम्यान ‘खाली पिली’ चित्रपटानंतर अनन्या आणि ईशानच्या अफेयरच्या अनेक चर्चा रंगल्या. तर ते दोघेही एकत्र मालदीव ट्रीपलाही गेले होते त्यानंतर त्यांच्या अफेअर च्या चर्चांना उधाण आलं. अनेकदा ते एकत्र ही स्पॉट होतात. तर आता ईशानने अनन्याला त्याची आवडती योगा पार्टनर सांगितल आहे.
  अनन्या लवकरच ‘लायगर’ (Liger) या तिच्या आगामी चित्रपटात दिसणार आहे. साऊथ अभिनेता विजय देवरकोंडा याच्यासोबत ती काम करणार आहे. यासोबतच ती साऊथ इंडस्ट्रीतही पदार्पण करत आहे. अनन्याने ‘स्टुडंट ऑप द इयर 2’ या करण जोहर निर्मित चित्रपटातून आपल्या करिअरला सुरूवात केली होती. अल्पावधीतच तिचा मोठा चाहतावर्ग निर्माण झाला आहे. तर ईशानने एका शॉर्टफिल्मपासून करिअरला सुरूवात केली होती. पण ‘धडक’ या चित्रपटानंतर तो प्रसिद्धीझोतात आला. ईशान हा अभिनेता शाहीद कपूरचा लहाण भाऊ आहे.
  Published by:News Digital
  First published:

  Tags: Ananya panday, Bollywood, Bollywood actress, Entertainment, Instagram, Social media trends

  पुढील बातम्या