मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /आलिया-रणबीर लग्न किंवा एंगेजमेंटसाठी नव्हे यासाठी गेले होते राजस्थानात, PHOTO आले समोर

आलिया-रणबीर लग्न किंवा एंगेजमेंटसाठी नव्हे यासाठी गेले होते राजस्थानात, PHOTO आले समोर

आलिया भट्ट (Alia Bhatt) आणि रणबीर कपूरचे (Ranbir Kapoor) कुटुंबीयसुद्धा एकत्रित राजस्थानसाठी निघाले तेव्हा सगळ्यांच्या मनात ही जोडी आता लग्नबंधनात अडकणार, असंच आलं होतं. पण...

आलिया भट्ट (Alia Bhatt) आणि रणबीर कपूरचे (Ranbir Kapoor) कुटुंबीयसुद्धा एकत्रित राजस्थानसाठी निघाले तेव्हा सगळ्यांच्या मनात ही जोडी आता लग्नबंधनात अडकणार, असंच आलं होतं. पण...

आलिया भट्ट (Alia Bhatt) आणि रणबीर कपूरचे (Ranbir Kapoor) कुटुंबीयसुद्धा एकत्रित राजस्थानसाठी निघाले तेव्हा सगळ्यांच्या मनात ही जोडी आता लग्नबंधनात अडकणार, असंच आलं होतं. पण...

  जयपूर, 2 जानेवारी: बॉलीवूड अभिनेता रणबीर कपूर (Ranbir Kapoor) आणि आलिया भट्ट(Alia Bhatt) आपल्या कुटुंबासोबत एकत्र मुंबईबाहेर पडले त्या वेळी सगळ्या मीडियात त्यांच्या लग्नाची चर्चा सुरू झाली होती. हे लोकप्रिय बॉलिवूड कपल लवकरच लग्नबंधनात अडकणार, राजस्थानात त्यांची एंगेजमेंट होणार वगैरे बोललं गेलं. पण प्रत्यक्षात हे दोघेही सहकुटुंब फक्त नववर्षाचं स्वागत करायलाच गेले होते.

  राजस्थानात 31 डिसेंबर साजरं केल्यानंतर ते रणथंबोरमध्ये (Ranthambor) गेले होते. यावेळी दोन्ही कुटुंबातील अनेक सदस्य बरोबर होते. आलिया भट्टबरोबर आई सोनी राजदान(Soni Rajdan) आणि बहीण शाहीन(Shaheen) देखील होती. त्याचबरोबर रणबीर कपूरबरोबर आई नितू कपूर(Neetu Kapoor) आणि बहीण रिद्धिमा(Riddhima) देखील होत्या. फिल्ममेकर अयान मुखर्जी (Ayan mukhrji) देखील बरोबर होता. दोघांची फॅमिली राजस्थानला जात असताना दोघांचा साखरपुडा होणार असल्याची अफवा सोशल मीडियावर पसरली होती. पण रणबीर कपूरचे काका रणधीर यांनी ही केवळ अफवा असल्याचंच स्पष्ट केले होते.

  उफ तेरी अदा: शिल्पा शेट्टीच्या बोल्ड PHOTOSOOT वर नवऱ्यानेही केली कॉमेंट

  त्यानंतर आता या फॅमिलीच्या सुट्ट्या साजऱ्या केल्याचे फोटो आलिया भट्टची बहीण शाहीन हिने आपल्या इंस्टाग्राम(Instagram) अकाउंटवरून शेअर केले आहेत. यामध्ये या जंगल सफारीची मजा घेताना दोघांचेही कुटुंबीय दिसून येत आहेत. या फोटोला तिने शानदार कॅप्शन देखील दिली असून ‘शानदार ट्रीपची समाप्ती’, असं ती लिहते.

  शाहीनने अपलोड केलेल्या एका फोटोत ओपन जीपमध्ये आलिया, रणबीर, नितू कपूर आणि सोनी राजदान जंगल सफारी करताना दिसून येत आहेत. एका फोटोमध्ये वाघही दिसतोय. हा फोटो रणबीर कपूर याने काढल्याचं शाहीन हिने क्रेडिट दिलं आहे.

  सलमान खाननं चुलीवर बनवलं जेवण, खमंग लसणीचा झणझणीत तडका दिल्याचा पाहा Video

  दरम्यान, लॉकडाऊनमध्ये आलिया भट्ट आणि रणबीर कपूर यांनी एकत्रित खूप काळ घालवला होता. त्याचबरोबर हे दोघे आपल्या लग्नाचे ठिकाण पाहण्यासाठी गेल्याच्या अफवा देखील पसरल्या होत्या. एका मुलाखतीमध्ये रणबीरने त्याच्या आणि आलियाच्या नात्याला दुजोरा देखील दिला आहे. लग्नाविषयी बोलताना त्याने कोरोना नसता तर आम्ही लग्न देखील केलं असतं अशी कबुली त्याने दिली. त्यामुळे मी आगामी 2021 मध्ये लग्न करणार असल्याचं त्यानं म्हटलं आहे. त्यामुळे आता हे दोघे कधी लग्न करतात याकडे त्यांच्या चाहत्यांचे लक्ष लागून आहे.

  First published:
  top videos

   Tags: Alia Bhatt, Bollywood, Ranbir kapoor