S M L

शोधा राज्य/ मतदार संघ

धमक्यांनंतर पोलिसांच्या संरक्षणात पद्मावती

आता दीपिका पदुकोणला धोका असल्याच लक्षात घेता तिच्या मुंबईच्या घराबाहेर पोलीस सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली आहे. 24 तास पोलीस दीपिकाच्या घराबाहेर पहारा देत आहेत.

Sonali Deshpande | Updated On: Nov 17, 2017 01:48 PM IST

धमक्यांनंतर पोलिसांच्या संरक्षणात पद्मावती

17 नोव्हेंबर : संजय लीला भन्साळी यांच्या पद्मावती सिनेमाची प्रदर्शनाची तारीख जसजशी जवळ येतेय, तसतसे या सिनेमासंबंधीचे वादही आणखीनच उफाळून येताहेत. अभिनेत्री दीपिका पदुकोणने या सिनेमाचं प्रमोशन केलं तर आम्ही तिचं नाक कापू टाकू, अशी धमकीच श्री राजपूत करणी सेनेच्या वतीने देण्यात आली आहे. करणी सेनेचे अध्यक्ष लोकेंद्र सिंह यांनी पत्रकार परिषद घेऊन ही धमकी दिली आहे.या धमकीनंतर आता दीपिका पदुकोणला धोका असल्याच लक्षात घेता तिच्या मुंबईच्या घराबाहेर पोलीस सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली आहे. 24 तास पोलीस दीपिकाच्या घराबाहेर पहारा देत आहेत.

करणी सेनेचे लोक इतक्यावरच थांबले नाहीत, करणी सेनेच्या समर्थकांनी या पद्मावती सिनेमाविरोधात सरकारला रक्ताची चिठ्ठी पाठवून संजय लीला भन्साळीचा निषेध केला आणि म्हणूनच इकडे मुंबईत खबरदारी म्हणून संजय लीला भन्साळीच्या घरासमोरची सुरक्षा व्यवस्थाही वाढवण्यात आली आहे.

या आधीही या सिनेमाला विरोध दर्शवत जयपूरच्या शूटिंग दरम्यान आमेर महलमधला या सिनेमाचा सेटही तोडण्यात आला होता.राजस्थानच्या दौसा जिल्ह्यामधल्या पोलीस स्टेशनमध्ये संजय लीला भन्साळी आणि दीपिका पादुकोण विरोधात देशद्रोह आणि इतिहास चुकीचा दाखवल्याबाबत एफआईआर दाखल करण्यात आली आहे.येत्या 1 डिसेंबरला पद्मावती सिनेमा प्रदर्शित होतोय. त्यामुळे हा सिनेमा प्रदर्शित होईपर्यंत आणि तो प्रदर्शित झाल्यानंतर या सगळ्यांची आणि प्रेक्षकांची काय भूमिका असणार आहे हे पाहणं महत्त्वाचं आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Nov 17, 2017 01:48 PM IST

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close