मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /

एअरपोर्टवर झाली सलमान खानची अडवणूक; युझर्स म्हणाले 'वर्दीची ताकद'

एअरपोर्टवर झाली सलमान खानची अडवणूक; युझर्स म्हणाले 'वर्दीची ताकद'

सलमान मुंबई विमानतळावर (Mumbai Airport) गुरूवारी रात्री उशीरा पोहोचला होता. त्याच्या आगामी चित्रपटाचं  पहिल्यांदा रशिया आणि त्यानंतर ऑस्ट्रिया तर नंतर अन्य लोकेशन्स असं होणार आहे. मात्र जाताना त्याला तैनात जवानांनी अडवलं.

  • Published by:  News Digital

मुंबई 20 ऑगस्ट : अभिनेता सलमान खानच्या (Salman Khan) चाहत्यांची गणना करणं फारच कठीण ठरेल. बॉलिवूडच्या भाईजानची मोठी फॅनफॉलोइंग आहे. मग ती भारतातच नाही भारताबाहेरही. प्रत्येक ठिकाणी सलमानच्या मागे पुढे अनेक कॅमेरे फिरत असतात. पण मुंबई विमानतळावर जेव्हा त्याला जवान अडवतात तेव्हा नेमकं काय घडतं पाहा.

सलमान मुंबई विमानतळावर (Mumbai Airport) गुरूवारी रात्री उशीरा पोहोचला होता. त्याच्या आगामी चित्रपटाचं शुटींग हे निरनिराळ्या देशांतील निरनिराळ्या लोकेशन्सवर होणार आहे. तेव्हा अभिनेत्री कतरिना कैफ (Katrina Kaif) आणि सलमान खान पहिल्यांदा रशिया आणि त्यानंतर ऑस्ट्रिया तर नंतर अन्य लोकेशन्स असा प्रवास करणार आहेत. तेव्हा नेहमीप्रमाणे अनेक फोटोग्राफर्स त्याच्यामागे धावत असतात. व सलमानला पोझ देण्यासाठी सांगत असतात. मात्र सलमान चालतचं असतो. पुढे आत जाण्यासाठी मात्र सुरक्षा दलाचे जवान त्याला अडवतात. त्यांच्या एका खुनेवर सलमान थांबतो.

सलमानला थांबल्यानंतर फोटोग्राफर्सनाही मागे जाण्यासाठी सांगण्यात येतं. व सगळे फोटोग्राफर्स मागे जातात. त्यानंतर अनेकानीं या व्हिडीओवर वर्दीची ताकद अश्या कमेंट्स केल्या आहेत. तर अनेकांनी या जवानांचं कौतुकही केलं आहे.

दरम्यान सलमान आणि कतरिना ‘टायगर 3’ च्या शुटींगसाठी रवाना झाले आहेत. अनेक दिवसांपासून या चित्रपटाचं शुटींग सुरू आहे. तर एका महत्त्वपूर्ण आणि अँक्शन सीनचं शुटींग करण्यासाठी ते रशियाला रवाना झाले असल्याचं सांगण्यात येत आहे. काही दिवस हे चित्रिकरण चालणार आहे.

याशिवाय सलमान त्याच्या अन्य चित्रपटांसाठीही लवकरच चित्रिकरण सुरू करणार आहे. शाहरूख खानच्या बहुप्रतिक्षीत पठाण चित्रपटात तो धमाकेदार कॅमियो देखील करणार आहे.

First published:

Tags: Bollywood actor, Entertainment, Salman khan