Elec-widget

पाॅप स्टार जस्टिन बिबरच्या म्युझिक शोसाठी काय आहे सुरक्षा व्यवस्था?

पाॅप स्टार जस्टिन बिबरच्या म्युझिक शोसाठी काय आहे सुरक्षा व्यवस्था?

कॅनेडीयन पॉप स्टार जस्टिन बिबर नवी मुंबईच्या डी वाय पाटील स्टेडियममध्ये आज ( 9 मे ) रात्री म्युझिक शो होतोय. एकूण ४५ हजार दर्शक या कार्यक्रमाला उपस्थित राहतील.

  • Share this:

09 मे : कॅनेडीयन पॉप स्टार जस्टिन बिबर नवी मुंबईच्या डी वाय पाटील स्टेडियममध्ये  उद्या ( 10 मे ) रात्री म्युझिक शो होतोय. एकूण ४५ हजार दर्शक या कार्यक्रमाला उपस्थित राहतील. ह्या कार्यक्रमासाठी नवी मुंबई पोलिसांनी सह आयोजकांकडून सुरक्षेची चोख व्यवस्था करण्यात आली आहे.

या शोसाठी मात्र ३ ते ६ या वेळेतच प्रवेश दिला जाणार आहे. त्या नंतर कुणालाही प्रवेश दिला जाणार नाही. बरोबर पार्किंग स्थळ ते स्टेडियमपर्यंत प्रेक्षकांना  घेऊन जाण्यासाठी आणि परत  पार्किंग स्थळापर्यंत आणण्यासाठी आयोजकांकडून वेगळ्या शटल बसची व्यवस्था  करण्यात आलीय. स्टेडियमच्या आत बॅग, पिण्याचं पाणी किंवा इतर शीत पेय घेऊन जाण्यास पूर्णपणे  मनाई असणारा आहे . मात्र मोबाईल फोन आत घेऊन जाता येणार आहेत.

स्टेडियमच्या आत तसंच परिसरात सुद्धा सी सी टीव्ही  बसवण्यात आले आहेत. त्याचं मॉनिटरिंग पोलीस करणार आहेत. त्याचबरोबर ५०० पोलीस जवान तैनात करण्यात येणार आहेत. २५ पोलीस अधिकारीसुद्धा तैनात राहणार आहेत .चार स्तरावर  सिक्युरिटीची व्यवस्था राहणार आहे.त्या मध्ये साध्या  कपड्यातील पोलीस  आणि वर्दीमधील  पोलीस असणार आहेत. रिजर्व्ह  पोलीस फोर्स सुद्धा तैनात राहणार आहे. कोणतीही घटना किंवा दुर्घटना झाल्यास ही  रिजर्व्ह  फोर्स परिस्थिती हाताळतील.

स्टेडियमच्या आस पास वन- वे आणि काही ठिकाणी पूर्णपणे रस्ता  बंद केला जाणार आहे. स्टेडियमच्या  दीड  किलोमीटर परिसरात ही व्यवस्था असणार आहे.

जस्टीन बिबरचं सेलिब्रिटी स्टेटस बघता आणि त्याच्या शोसाठी होणारी गर्दी बघता इतनी सिक्युरीटी तो बनती है बॉ़स!

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: May 9, 2017 01:35 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...