Home /News /entertainment /

केवळ दीपिका-सारा नाही तर अन्य 39 बॉलीवूड सेलिब्रिटी NCBच्या रडारवर

केवळ दीपिका-सारा नाही तर अन्य 39 बॉलीवूड सेलिब्रिटी NCBच्या रडारवर

दीपिका पादुकोणच्या मुंबईस्थित घराची सुरक्षा वाढवण्यात आली आहे. याआधी गोवा विमानतळावर देखील सुरक्षा वाढवण्यात आली होती.

    मुंबई, 25 सप्टेंबर : सुशांत सिंह राजपूत मृत्यू (Sushant Singh Rajput Death Case) प्रकरणी समोर आलेल्या ड्रग कनेक्शनमध्ये अनेक बॉलिवूड कलाकारांचे नाव समोर आले आहे. यामध्ये काही मोठी नावं समोर येत आहेत. अभिनेत्री रिया चक्रवर्तीला (Rhea Chakraborty) याप्रकरणात अटक करण्यात आली आहे. त्यानंतर एनसीबीकडून करण्यात आलेल्या चौकशीमध्ये अभिनेत्री दीपिका पादुकोण (Deepika Padukone), सारा अली खान (Sara Ali Khan), श्रद्धा कपूर (Shraddha Kapoor) आणि रकुल प्रीत सिंह (Rakul Preet Singh) या बड्या अभिनेत्रींची नावं समोर आली आहेत. या अभिनेत्रींसह एकूण 7 सेलिब्रिटीजना एनसीबीकडून समन पाठवण्यात आला आहे. अशी माहिती समोर येते आहे की, जवळपास 39 सेलिब्रिटी एनसीबीचीच्या रडारवर आहेत. अशावेळी दीपिकाच्या घराची सुरक्षा वाढवण्यात आली आहे. दीपिका गुरुवारी पती रणवीर सिंह (Ranveer Singh) याच्यासह गोव्याहून मुंबईत परतली आहे. अभिनेत्रीने व्यक्त केली तिच्या हत्येची शंका,म्हणाली-मी छताला लटकलेली आढळले तर... दीपिका पादुकोणच्या मुंबईस्थित घराची सुरक्षा वाढवण्यात आली आहे. याआधी गोवा विमानतळावर देखील सुरक्षा वाढवण्यात आली होती. मुंबई पोलिसांच्या सुरक्षेमध्ये अभिनेत्री दीपिका पादुकोण एनसीबीच्या ऑफिसमध्ये पोहोचणार आहे. अशावेळी दादर पोलीस ठाण्याची एक टीम प्रभादेवी याठिकाणी असणाऱ्या 'ब्यूमोंडे टॉवर'बाहेर तैनात आहे. दीपिका या अपार्टमेंटमध्ये राहते. दुसरीकडे अभिनेता रणवीर सिंग (Ranveer Singh) याने एनसीबीकडे असा अर्ज केला आहे की, दीपिकाच्या चौकशीदरम्यान त्याने तिथे असणे आवश्यक आहे कारण तिला कधी कधी पॅनिक अॅटॅक येतात आणि भीती देखील वाटते. त्यामुळे त्याला दीपिकाबरोबर असण्याची परवानगी देण्यात यावी. दीपिकाच्या चौकशीदरम्यान उपस्थित राहणार रणवीर सिंह? परवानगीसाठी NCBकडे केला अर्ज अभिनेत्री दीपिका पादुकोणपर्यंत एनसीबीची चौकशी पोहोचली आहे कारण ड्रग केसमध्ये एक WhatsApp चॅट समोर आले आहे. 2017 मध्ये झालेले हे संभाषण दीपिका आणि तिच्या मॅनेजरमधील आहे. या संभाषणाच्या आधारे दीपिकाला चौकशीसाठी समन जारी करण्यात आला आहे. याआधी दीपिका पादुकोणची मॅनेजर करिश्मा प्रकाश हिला देखील चौकशीसाठी बोलावण्यात आले होते, मात्र तिने आरोग्यविषयक समस्येमुळे आणखी वेळ मागितला आहे. त्याकरता तिला शुक्रवारपर्यंत उपस्थित राहण्याची सूट देण्यात आली होती.
    Published by:Manoj Khandekar
    First published:

    Tags: Bollywood

    पुढील बातम्या