'14 दिन में कुछ बडा होनेवाला है', 'ही' आहे सेक्रेड गेम्स-2ची रिलीज डेट

नेटफ्लिक्स इंडियावर जुलै 2018 प्रदर्शित झालेल्या 'सेक्रेड गेम्स' या वेबसीरिजनं अक्षरशः धुमाकुळ घातला होता.

News18 Lokmat | Updated On: Mar 20, 2019 09:44 AM IST

'14 दिन में कुछ बडा होनेवाला है', 'ही' आहे सेक्रेड गेम्स-2ची रिलीज डेट

मुंबई, 20 मार्च :  'सेक्रेड गेम्स' या नेटफ्लिक्स इंडियावरील वेबसीरिजनं संपूर्ण देशाला वेड लावलं आहे. जुलै 2018 मध्ये रिलीज झालेल्या या वेबसीरिजनं अक्षरशः धुमाकुळ घातला होता. आता सेक्रेड गेम्स सीझन-2ची प्रेक्षक आतुरतेनं वाट पाहत आहेत. तुमची ही उत्सुकता आता अधिक काळ ताणली जाणार नाही. कारण प्रेक्षकांची प्रतीक्षा लवकरच संपणार असून येत्या काही दिवसांतच वेबसीरिजचा दुसरा सीझन रिलीज करण्यात येणार आहे. नेटफ्लिक्स इंडियाच्या अधिकृत ट्विटर हँडलवरून याबाबतची माहिती देण्यात आली. दमदार संवाद आणि वेगळ्या धाटणीचं कथानक असलेल्या या वेबसीरिजला देशातच नाही तर परदेशातही तुफान प्रसिद्धी मिळाली.


Calendar nikaal. Tareekh likh le. 14 din mein kuch bada hone wala hai.

Loading...

'कॅलेंडर निकाल, तारीख लिख ले, 14 दिन में कुछ बडा होनेवाला हैं' असं ट्विट नेटफ्लिक्स इंडियानं केलं आहे. या ट्विटचा संबंध 'सेक्रेड गेम्स'च्या संवादांशी असल्यानं पुढच्या 14 दिवसांत सेक्रेड गेम्सचा दुसरा सीझन प्रदर्शित होईल, असा अंदाज लावला जात आहे. नेटफ्लिक्स इंडियानं 21 सप्टेंबर2018ला सीझन-2 चा टीझर प्रदर्शित केला होता. यात गणेश गायतोंडेनं घोषणा केली होती की, 'आता देवही तुम्हाला वाचवू शकत नाही.' यावरून पहिल्या भागात गणेश गायतोंडे आणि सरताज सिंग यांच्यातील रहस्यमय नात्याचा उलगडा दुसऱ्या भागात होणार का?, या प्रश्नाचं उत्तर मिळवण्यासाठी प्रेक्षक सेक्रेड गेम्स-2ची वाट पाहत आहेत.     टीझर प्रदर्शित झाल्यापासूनच 'सेक्रेड गेम्स 2' बाबतची उत्सुकता अधिकच वाढली आहे.


'सेक्रेड गेम्स'चं कथानक मुंबईतील माफिया जगताभोवती फिरतं. या वेबसीरिजमध्ये पहिल्या भागाप्रमाणे माफिया गणेश गायतोंडेची दहशत दुसऱ्या भागातही कायम राहणार असून पोलीस अधिकारी सरताज सिंग मुंबईला गणेश गायतोंडेच्या क्रुरतेपासून कसं वाचवणार हे पाहणं औत्सुक्याचं असणार आहे. ही वेबसीरिज विक्रम चंद्रा यांच्या 'सेक्रेड गेम्स' या कादंबरीवर आधारित असून यात नवाझुद्दीन सिद्दीकी, सैफ अली खान, राधिका आपटे, पंकज त्रिपाठी यांच्या प्रमुख भूमिका आहेत. वेबसीरिजच्या दुसऱ्या भागाचं दिग्दर्शन अनुराग कश्यप आणि नीरज घायवान यांनी केलं आहे. तर विक्रमादित्य मोटवाणी यांनी वेबसीरिजचं संवाद लेखन केलं आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Mar 20, 2019 09:44 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...