हॅरी आणि सेजलचं 'बीच बीच मे'

बीच बीच में हे दुसरं गाणं एक डिस्को सॉंग आहे.

  • Share this:
04 जुलै :शाहरूख- अनुष्काच्या 'जब हॅरी मेट सेजल'मधलं दुसरं गाणं 3जुलैला लॉंच झालंय.बीच बीच में हे दुसरं गाणं एक डिस्को सॉंग आहे. याच चित्रपटाचं पहिलं गाणं 'में बनी तेरी राधा' हे वादाच्या भोवऱ्यात अडकलं होतं. त्यावर बरीच टीकाही झाली होती. पण दुसरं गाणं मात्र एक लाइट सॉंग आहे. हे गाणं गायलंय शाल्मली खोलगडे आणि अरिजीत सिंगने. या गाण्याच्या बिट्सवर शाहरूख आणि अनुष्का छान थिरकतायत. अॅशले लोबोनं या गाण्याची सुंदर कोरिओग्राफी केलीय. सोपे तरीही गुणगुणावेसे वाटणारे या गाण्याचे बोल लिहिले आहेत इरशाद कामिलने. या साऱ्या डोलाऱ्याला प्रीतमच्या संगीताची उत्तम जोड आहे. या गाण्याच्या लाँचिगला इम्तियाझ,शाल्मली,शाहरूख,अनुष्का आले होते. लॉंचिंगच्या वेळी शाल्मली हे गाणं गुणगुणतही होती.
First published: