सनी लिओनला पाहण्यासाठी 'या' अफाट गर्दीची तुलना थेट ट्रम्पंच्या सभेशी !

सनी लिओनला पाहण्यासाठी 'या' अफाट गर्दीची तुलना थेट ट्रम्पंच्या सभेशी !

आपल्या एका ब्रॅन्डचं प्रमोशन करण्यासाठी सनी नुकतीच कोचीला गेली होती. तेव्हा सनीला पाहायला जमा झालेली गर्दी पाहून सनी स्वत:च थक्क होऊन गेली

  • Share this:

कोची,19 ऑगस्ट: आपल्या आयटम साँग आणि सिनेमातील अभिनयाने सनी लिओनने बॉलिवूडमध्ये आपलं एक वेगळं स्थान निर्माण केलं आहे. आता भारतात सनीच्या फॅन्सची संख्याही प्रचंड आहे. आणि म्हणूनच की काय सनीला पाहण्यासाठी कोचीमध्ये अफाट गर्दी झाली होती.

आपल्या एका ब्रॅन्डचं प्रमोशन करण्यासाठी सनी नुकतीच कोचीला गेली होती. तेव्हा सनीला पाहायला जमा झालेली गर्दी पाहून सनी स्वत:च थक्क होऊन गेली. या गर्दीचा व्हिडिओही सनीने ट्विटरवर शेअर केलाय. तर त्याच्या पुढे जाऊन तिच्या नवऱ्याने म्हणजेच डॅनिअल वेबरने या गर्दीची तुलना ओबामा आणि ट्रम्पच्या सभांना जमणाऱ्या गर्दीशी केली आहे. ही गर्दी सनीच्या नावाचा गजर करत होती.

&

या साऱ्यावरून तरी सनी भारतात सध्या प्रचंड पॉप्युलर आहे असं दिसतंय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Aug 19, 2017 05:50 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading