मुंबई, 27 जानेवारी : सर्वोच्च न्यायालयानंही (Supreme Court) तांडवला (Tandav) मोठा दणका दिला आहे. या वादग्रस्त वेबसीरिजशी संबंधित असलेल्यांन सुरक्षा नाकारात त्यांना उच्च न्यायालयात जाण्याचे आदेश दिले आहेत. तांडवच्या निर्मात्यांनी सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली होती. या याचिकेवर बुधवारी सुनावणी झाली.
तांडवविरोधात सहा राज्यांमध्ये 7 FIR दाखल आहेत. दिग्दर्शक अली अब्बास जफर यांच्यासोबत अनेकांविरोधात ही एफआयआर आहे. या सर्व एफआयर रद्द करण्याची मागणी करणारी याचिका सुप्रीम कोर्टात दाखल करण्यात आली होती. तसंच सुरक्षा पुरवण्याचीही मागणी करण्यात आली होती.
Supreme Court is hearing petitions by actor Mohd Zeeshan Ayyub, Amazon Prime Video (India) & makers of ‘Tandav’, seeking protection from arrest & clubbing of several FIRs registered against them for allegedly hurting religious sentiments and telecasting 'objectionable content'. pic.twitter.com/5m78FVDWEA
सुप्रीम कोर्टानं अभिनेता मोबम्मद झिशान अय्युब, अॅमेझॉन प्राइम व्हिडीओ आणि तांडवच्या मेकर्सना अटकेपासून सुरक्षा देण्याचं नाकारलं आहे. तसंच अटकपूर्व जामिनासाठी आणि एफआयर रद्द करण्यासाठी उच्च न्यायालयात जाण्याचे आदेश दिले आहेत.
तांडवच्या वेब सीरीज पहिल्या एपिसोडमध्ये 17व्या मिनिटाला दाखवण्यात आलेल्या हिंदू देवी-देवतांना अमर्याद पद्धतीने दाखवून धार्मिक भावना भडकवल्याचा आरोप लावण्यात आला आहे. तसंच महिलांचा अपमान केल्याने वेब सीरीजचा हेतू एका समुदायाच्या धार्मिक भावना भडकवल्याचंही म्हटलं आहे. या सीरीजचा व्यापक प्रसार समाजासाठी हानिकारक असल्याचं म्हणत वेब सीरीजविरोधात एफआयआर दाखल करण्यात आली आहे. यावर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली.