रितेश देशमुखच्या 'माऊली'मध्ये कोण आहे बाॅलिवूड अभिनेत्री?

रितेश देशमुखच्या 'माऊली'मध्ये कोण आहे बाॅलिवूड अभिनेत्री?

रितेशची बायको जेनेलिया डिसुझानं ट्विट करून म्हटलंय, 'तुझं आमच्या कुटुंबात स्वागत असो. मला खात्री आहे, तुझा प्रवास मस्त होईल.'

  • Share this:

07 मे : राकेश ओमप्रकाश मेहराच्या 'मिर्ज्या' सिनेमातली अभिनेत्री सैयामी खेर आता मराठीत येतेय. रितेश देशमुखच्या 'माऊली' सिनेमात सैयामीची भूमिका आहे.

या सिनेमात सैयामी रितेश देशमुखसोबत दिसणार आहे. रितेशची बायको जेनेलिया डिसुझानं ट्विट करून म्हटलंय, 'तुझं आमच्या कुटुंबात स्वागत असो. मला खात्री आहे, तुझा प्रवास मस्त होईल.'

माऊलीची निर्मिती रितेश देशमुखच करतोय. सिनेमाचं दिग्दर्शन आदित्य सरपोतदार करणारेय. मराठी सिनेमात काम करणं सैयामीसाठी खासच आहे. कारण अभिनेत्री उषा किरण या सैयामीच्या आजी आहेत.

सैयामी नाशिकची आहे. माऊलीचं शूटिंग सुरू झालंय. सिनेमा 2019च्या सुरुवातीला रिलीज होणारेय.

 

First Published: May 7, 2018 04:47 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading