मुंबई, 04 डिसेंबर : मराठीतील गुणी अभिनेत्री असं म्हटलं तर सगळ्यात पहिल्यांदा सायली संजीवचं नाव समोर येईल. मालिकेतून अभिनय क्षेत्रात पाऊल ठेवलेल्या सायलीने आज चित्रपटसृष्टीत आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. मालिका, चित्रपट, वेब स्टोरीज अशा सगळ्या माध्यमांत तिने काम केलं आहे. सायली लवकरच 'गोष्ट एका पैठणीची' या राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. सध्या सायली तिच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल चर्चेत आहे. तिचं नाव क्रिकेटर ऋतुराज गायकवाड सोबत नेहमीच जोडलं जातं. मध्यंतरी सायलीच्या पोस्टवर ऋतुराजविषयी कमेंट केल्या होत्या. आता तिने अखेर या चर्चांवर मौन सोडलं आहे.
सायली आणि ऋतुराज एकमेकांना डेट करत असल्याच्या चर्चांनी जोर धरला असताना आता अभिनेत्रीने मोठा खुलासा केला आहे. एका मुलाखतीत सायलीला ऋतुराज सोबत असलेल्या नात्याबद्दल विचारण्यात आलं. महत्त्वाचं म्हणजे सायलीने दिलेल्या उत्तराकडे सर्वांना थक्क केलं आहे. ऋतुराजसोबत असलेल्या नात्यावर अभिनेत्री म्हणाली, 'जेव्हा आमच्या नात्याबद्दल चर्चा रंगू लागल्या तेव्हा त्याचा परिणाम आमच्या मैत्रीवर झाला. आता आमच्या नात्यात दुरावा निर्माण झाला आहे. आता आम्ही मित्रासारखं बोलू देखील शकत नाही. माझं नाव त्याच्यासोबत जोडलं जातंय हे देखील मला माहित नव्हतं...'
हेही वाचा - Sonam Kapoor : लेकाच्या आठवणीत इमोशनल झाली सोनम; म्हणाली 'त्याला एकटं सोडून जाताना...'
पुढे सायली म्हणाली, 'आमच्या वयाबद्दल देखील सर्वत्र चर्चा रंगू लागल्या. मी 29 वर्षांची आणि ऋतुराज 25 वर्षांचा आहे. आम्ही सुरुवातीला बोलायचो पण आता आमच्यात गप्पा होत नाहीत.' अशा भावना सायलीने व्यक्त केल्या आहेत. सायलीने दिलेल्या या स्पष्टीकरणामुळे ऋतुराज आणि तिच्या नाट्यविषयीच्या चर्चांना पूर्णविराम मिळाला आहे.
View this post on Instagram
सायली संजीवने झी मराठीवरील ‘काहे दिया परदेस’ मालिकेतून अभिनय क्षेत्रात पदार्पण केले. ही तिची पहिली मालिका होती. या मालिकेमुळे ती घराघरात पोहोचली. यानंतर तिने आतापर्यंत अनेक चित्रपट आणि मालिकांमध्ये काम केले आहे. सौंदर्य आणि उत्तम अभिनयशैली यांच्या जोरावर सायलीने सिनेसृष्टीत तिचे अढळ स्थान निर्माण केले आहे.
काही दिवसांपूर्वी ती 'हर हर महादेव' या चित्रपटात ती छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पत्नीची भूमिका साकारली होती. त्याबरोबरच तिची प्रमुख भूमिका असलेला 'गोष्ट एका पैठणीची' हा चित्रपटही लवकरच प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटासाठी तिला राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त झाला आहे. तिचा हा चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला असून त्याला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Marathi actress, Marathi cinema, Marathi entertainment