अभिनेता झाला खरा चौकीदार, अक्षय कुमारसोबत केलं होतं काम

एकेकाळी गुलाल, पटियाला हाऊस, ब्लॅक फ्रायडे सारख्या सिनेमांमध्ये भूमिका सकारणारे अभिनेता सवि सिद्धू सध्या सेक्युरिटी गार्डची नोकरी करत आहेत.

News18 Lokmat | Updated On: Mar 20, 2019 11:27 AM IST

अभिनेता झाला खरा चौकीदार, अक्षय कुमारसोबत केलं होतं काम

आजच्या आधुनिक जगात, 'रावाचा रंक व्हायला वेळ लागत नाही' ही म्हण कधी वास्तवात येईल हे काही सांगता येत नाही. बॉलिवूडमध्ये तर या गोष्टी अनेकदा घडत असतात. कोणतीच गोष्ट निश्चित नसलेल्या या सिनेसृष्टीत रिअल लाइफ आणि रील लाइफ यात खूपच तफावत असेलेली दिसून येते.

जीवन कधी सिनेमासारखं नसतं असं म्हणतात आणि ही गोष्ट अभिनेता सावि सिद्धू यांना तंतोतंत लागू होते. एकेकाळी गुलाल, पटियाला हाऊस, ब्लॅक फ्रायडे सारख्या सिनेमांमध्ये भूमिका सकारणारे सवि सिद्धू सध्या सेक्युरिटी गार्डची नोकरी करत आहेत.

जीवन कधी सिनेमासारखं नसतं असं म्हणतात आणि ही गोष्ट अभिनेता सावि सिद्धू यांना तंतोतंत लागू होते. एकेकाळी गुलाल, पटियाला हाऊस, ब्लॅक फ्रायडे सारख्या सिनेमांमध्ये भूमिका सकारणारे अभिनेता सवि सिद्धू सध्या सेक्युरिटी गार्डची नोकरी करत आहेत.

सवि सिद्धू यांनी आपल्या बॉलिवूड करिअरची सुरूवात चंदिगढमध्ये मॉडेलिंग क्षेत्रातून केली आहे. त्यानंतर ते लखनऊला परतले आणि त्यांची कायद्याचा अभ्यास सुरु केला. याच दरम्यान त्यांनी नाटकातही काम केलं. त्यानंतर अनुराग कश्यप यांनी त्यांना आपल्या 'पांच' या सिनेमासाठी कास्ट केलं मात्र हा सिनेमा काही कारणाने प्रदर्शित होऊ शकला नाही.

Loading...

यानंतर सविंनी अनुराग कश्यपच्याच 'ब्लॅक फ्रायडे'मध्ये कमिशनर सामराची महत्वाची भूमिका साकारली. तसेच अनुरागचा दुसरा सिनेमा 'गुलाल'मध्येही त्यांनी काम केलं. याशिवाय त्यांनी यशराज फिल्मसोबतही काम केलं आहे.

'जेव्हा माझी तब्बेत बिघडू लागली तेव्हा माझ्या वाईट वेळेची सुरूवात झाली', असं सवि सिद्धू सांगतात. 'माझ्या पत्नीचा मृत्यू झाला तो माझ्यासाठी सर्वात कठीण काळ होता. त्यानंतर माझे आई वडील आणि जवळच्या लोकांचाही मृत्यू झाला. हळुहळू एकटा पडत गेलो. सध्या मी सेक्युरिटी गार्डची नोकरी करत आहे. चित्रपट दिग्दर्शकांना भेटायला जाण्यासाठी माझ्याकडे बससाठी पुरसे पैसेही नाहीत,' असं त्यांनी सांगितलं.

सवि सिद्धू सकाळी 8 ते रात्री 8 अशी 12 तासांची ड्यूटी करतात. त्यांना मोजून फक्त 5 ते 6 तासांची झोप मिळते. पण आपल्याला सिनेसृष्टीत पुन्हा काम मिळेल आणि आपले मागचे दिवस परत येतील अशी अशा त्यांना अजूनही वाटते.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Mar 20, 2019 11:06 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...