Home /News /entertainment /

'भाभीजी घर पर है' मध्ये दिसणार नाही गोरी मेम, या कारणामुळे सोडली मालिका

'भाभीजी घर पर है' मध्ये दिसणार नाही गोरी मेम, या कारणामुळे सोडली मालिका

टेलिव्हिजनवरील प्रसिद्ध कॉमेडी मालिका 'भाभीजी घर पर है'च्या (Bhabi Ji Ghar Par Hain) दर्शकांसाठी वाईट बातमी आहे. या मालिकेतून घराघरात पोहोचलेला चेहरा अभिनेत्री सौम्या टंडन (Saumya Tandon) ही मालिका सोडत आहे.

  मुंबई, 20 ऑगस्ट : टेलिव्हिजनवरील प्रसिद्ध कॉमेडी मालिका 'भाभीजी घर पर है'च्या (Bhabi Ji Ghar Par Hain) दर्शकांसाठी वाईट बातमी आहे. या मालिकेतून घराघरात पोहोचलेला चेहरा अभिनेत्री सौम्या टंडन (Saumya Tandon) ही मालिका सोडत आहे. या मालिकेतील तिची अनिता उर्फ 'गोरी मेम'ची भूमिका विशेष गाजली आहे. सौम्या शो सोडणार याच्या चर्चा गेले अनेक दिवस होत्या. अखेर तिने हा निर्णय घेतला आहे. टाइम्स ऑफ इंडियाने याबाबत वृ्त्त दिले आहे. या मीडिया अहवालानुसार सौम्याने असे म्हटले आहे की, 'हो मी माझे काँट्रॅक्ट रिन्यू न करण्याचा निर्णय घेतला आहे. उद्या (21 ऑगस्ट) हा माझा शूटिंगचा शेवटचा दिवस असेल. अखेर मी हा शो सोडणार की नाही याबाबत लोक अनुमान बांधायचे थांबवतील.' मालिका यशाच्या शिखरावर असताना ही भूमिका का सोडत असल्याचे सौम्याने स्पष्ट केले. तिने असे म्हटले की, 'तुम्ही म्हणू शकता की एका स्थिर कार्यक्रमात स्थिर नोकरी सोडणे हा एक अव्यवहार्य निर्णय आहे. परंतु, मला हे समजले की नोकरी करणे आणि नियमित उत्पन्न मिळवणे फार एक्सायटिंग नव्हते. कलाकार म्हणून एक वाढ व्हावी अशी इच्छा आहे, एक कलाकार म्हणून विकासाला वाव मिळेल अशा प्रोजेक्ट्सची मला इच्छा आहे.' (हे वाचा-पाकिस्तानी अभिनेत्याला घेऊन सुशांतवर सिनेमा? OTT प्लॅटफॉर्मने दिलं स्पष्टीकरण)
  ती पुढे असेही म्हणाली की, 'भाभीजी... ने माझ्या विकासात मदत केली नाही असे नाही. हा खूप सुंदर प्रवास होता. पण आता ही भूमिका जवळपास 5 वर्षांसाठी करतेय. आणखी 5 वर्ष ही भूमिका करताना मी मला पाहत नाही आहे. हा निर्णय भावनेच्या भरात घेतलेला नाही आहे. हे खरे आहे की माझी हेअर ड्रेसर कोरोना पॉझिटिव्ह आढळून आल्यानंतर मी थोडी चिंतेत होते. पण मी माझा नोटीस पीरिएड पूर्ण केला आहे.' (हे वाचा-Birthday Special: रणदीपने केलं आहे वेटर-ड्रायव्हरचं काम, या सिनेमाने बनवलं स्टार) कोरोनाकाळात निर्मात्यांकडून कमी पगार मिळाल्यामुळे शो सोडत असल्याची बाब सौम्याने फेटाळली आहे. बॉलिवूडमध्ये देखील प्रयत्न करण्याची योजना असल्याचे सौम्या यावेळी म्हणाली. भाभीजीची टीम नेहमीच मिस करेन अशी प्रतिक्रिया यावेळी सौम्याने दिली आहे. कंफर्ट झोनच्या बाहेर जाऊन काम करायचे आहे असं यावेळी ती म्हणाली.
  Published by:Janhavi Bhatkar
  First published:

  Tags: Saumya tandon

  पुढील बातम्या