मुंबई 4 जून: एकीकडे लसींची कमतरता भासत असल्यामुळं सामान्य नागरिक लसीकरणाच्या प्रतीक्षेत बसलाय, तर दुसरीकडे अत्यावश्यक सेवेची बनावट ओळखपत्रं तयार करून लसीकरण करणाऱ्यांची संख्या देखील झपाटय़ाने वाढू लागली आहे. (corona vaccine) धक्कादायक बाब म्हणजे या प्रकारात काही बॉलिवूड सेलिब्रिटींची नावं देखील समोर येत आहेत. अलिकडेच मीरा चोप्रावर (Meera Chopra) खोट्या ओळखपत्राद्वारे लस घेतल्याचा आरोप करण्यात आला होता. त्यानंतर असाच आरोप आता अभिनेत्री सौम्या टंडनवर (Saumya Tandon) केला जात आहे.
Fake
— Saumya Tandon (@saumyatandon) June 4, 2021
‘असे पब्लिसिटी स्टंट पुन्हा करु नका’; जूही चावलाची 5G याचिका कोर्टानं फेटाळली
भाभीजी घर पर है (Bhabi Ji Ghar Par Hai) या मालिकेतून घराघरात पोहोचलेली सौम्या सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहे. तिच्या नावाचं एक बनावट ओळखपत्र (Fake ID) सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हे ठाण्यातील एका कोव्हिड रुग्णालयाचं ओळखपत्र आहे. हे बनावट ओळखपत्र दाखवून तिनं लसीकरण केलं आसा आरोप तिच्यावर केला जात आहे. शिवाय यासाठी तिच्यावर कडक कारवाई करावी अशी मागणी देखील काही नेटकरी करत आहेत.
या 10 अभिनेत्री लॉकडाउनमध्येही करतायेत कोट्यवधींची कमाई
Contrary to some media reports claiming that I have taken my first Covid vaccine dose from A facility in Thane by dubious means is untrue. I have taken my first jab but from a centre near my house following proper procedures. Please don’t believe in unverified reports and claims.
— Saumya Tandon (@saumyatandon) June 4, 2021
सौम्यानं मात्र हे आरोप फेटाळून लावले आहेत. “कुठलंही बनावट ओळखपत्र दाखवून मी लसीकरण केलं नाही. सरकारच्या नियमाप्रमाणेच मी पहिला डोस घेतला. माझ्या विरोधात काही बातम्या पसरल्या जात आहे त्या खोट्या आहेत. कृपया त्याकडे दुर्लक्ष करा.” अशा आशयाचं ट्विट करुन या आरोपांवर सौम्यानं प्रत्युत्तर दिलं. तिचं हे ट्विट सध्या सोशल मीडियावर सर्वांचेच लक्ष वेधून घेत आहे. पण सोबतच जे ओळखपत्र सर्वत्र चर्चेत आहे त्याची निर्मिती कोणी केली? हा सवाल देखील वारंवार विचारला जात आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Bollywood actress, Corona vaccine, Crime, Entertainment