मुंबई, 24 नोव्हेंबर : टेलिव्हिजन विश्वासाठी आणखी एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. अभिनेता आशिष रॉय (Ashish Roy) यांचे निधन झाले आहे. दीर्घकाळापासून ते मुत्रपिंडाच्या आजाराचा सामना करत होते. किडनी फेल झाल्यामुळे त्यांच्या मृत्यू झाला. गेल्या काही काळापासून त्यांच्यावर उपचार सुरू होते, मात्र आर्थिक चणचण देखील होती. त्यामुळे या आजारपणाच्या काळात त्यांनी अनेक समस्यांचा सामना केला होता.
'ससुराल सिमर का' शिवाय अनेक टेलिव्हिजन मालिकांच्या माध्यमातून ते घराघरात पोहोचले होते. पैशांची चणचण असल्यामुळे आशिष यांच्यावर नीट उपचार देखील झाले नव्हते. त्यांच्या एका मित्राने फेसबुकच्या माध्यमातून देखील मदत मागितली होती.
एका मुलाखतीदरम्यान आशिष रॉय यांनी असे म्हटले होते की त्यांना उपचारांसाठी पैशाची गरज आहे, अन्यथा डॉक्टर उपचार बंद करतील. आशिष रॉय यांना एका महाविद्यालयीन विद्यार्थ्यार्थ्याने मदत केली होती. स्पॉटबॉयच्या वृत्तानुसार त्यांनी सलमान खानकडून मदत मिळवण्यासाठी देखील प्रयत्न केले होते. मात्र तिथूनही कोणती मदत मिळाली नव्हती.
55 वर्षीय या अभिनेत्याने सहा महिन्यांपूर्वी फेसबुकच्या माध्यमातून डायसिसीस बाबत माहिती देत मदतीचे आवाहन केले होते. यावेळी त्यांना लवकराक लवकर बरे वाटावे याकरता अनेकांनी प्रार्थना केली होती. त्यावेळी त्यांनी त्यांच्याबरोबर कुणीच नसल्याचे संकेतही दिले होते. या दरम्यान फिल्ममेकर हंसल मेहता यांनी त्यांना मदत करत इतरांनीही मदत करण्याचं आवाहन केलं होतं.
Actor Ashish Roy (Bond) is seriously ill, on dialysis and in the ICU. He has appealed for financial help on FB. I'm doing all I can to help. Can industry associations also help the ailing actor? @sushant_says@ashokepandithttps://t.co/d8qpAan1VK
आशिष रॉय यांनी अनेक मालिकांमधून काम केलं आहे. याशिवाय त्यांनी नेताजी सुभाष चंद्र बोस: द फॉरगॉटन हिरो, होम डिलिव्हरी, MP3: मेरा पेहला पेहला प्यार यांसारख्या चित्रपटात देखील काम केलं आहे. त्याचप्रमाणे त्यांनी रिमिक्स, मेरे अंगने मैं आणि Mrs. & Mr. शर्मा अलाहाबादवाले या मालिकांत काम केले होते.