Elec-widget

टीव्हीवरील या प्रसिद्ध बालकलाकाराचा मृत्यू, आईसमोरच गेला जीव

टीव्हीवरील या प्रसिद्ध बालकलाकाराचा मृत्यू, आईसमोरच गेला जीव

शिवलेख मुळचा छत्तीसगढचा राहणारा असून, गेल्या 10 वर्षांपासून त्याचे आई- वडील मुंबईत राहत होते.

  • Share this:

मुंबई, 19 जुलै- बालकलाकार शिवलेख सिंह याची अपघाती मृत्यू झाला. तो 14 वर्षांचा होता. गुरुवारी छत्तीसगड येथील रायपुरच्या जवळपासच्या परिसरात त्याची गाडी ट्रकला जाऊन आदळली. यात शिवलेखचा मृत्यू झाला. गाडीत शिवलेखचे आई- वडिला आणि एक तिसरी व्यक्तिही बसलेली होती. तिघंही अघातात गंभीर जखमी झाले. रायपुरचे पोलीस अधिक्षक आरिफ शेख यांनी या घटनेला दुजोरा दिला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुरुवारी दुपारी साधारण 3 वाजता धारासिवा परिसरात ही घटना घडली.

 

Loading...

View this post on Instagram

 

The world as we have created it is a process of our thinking #kesari #Nandan #actorslife #party #birthday #Somethingcooking @iamchahattewani @manavgohil @shoaib_official_ali @aasthachaudhary @ankitarora2317 @reshmashinde45_official @mayanknishchal

A post shared by SHIVLEKH SINGH (@shivlekh) on

गाडी आणि ट्रकच्या या धडकेत शिवलेखचा जागीच मृत्यू झाला. त्याची आई लेखना, वडील शिवेंद्र सिंह आणि तिसरी व्यक्ती नवीन सिंह गंभीर जखमी झाले. यात शिवलेखच्या आईची तब्येत नाजूक आहे. ते सर्व बिलासपुरहून रायपुरला जात होते, तेव्हाच त्यांच्या गाडीची टक्कर समोरून येणाऱ्या ट्रकशी झाली. अपघातानंतर ट्रक चालक फरार असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, शिवलेख रायपुरमध्ये पत्रकारांना मुलाखत देण्यासाठी जात होता.

 

View this post on Instagram

 

#Happy #Republic #Day #to #all

A post shared by SHIVLEKH SINGH (@shivlekh) on

शिवलेख मुळचा छत्तीसगढचा राहणारा असून, गेल्या 10 वर्षांपासून त्याचे आई- वडील मुंबईत राहत होते. शिवलेखने अनेक हिंदी मालिकांमध्ये काम केलं आहे. संकटमोचन हनुमान, बालवीर आणि ससुराल सिमर का या मालिकांमध्ये त्याने बालकलाकार म्हणून काम केलं. याशिवाय त्याने रिअलिटी शोमध्येही भाग घेतला होता.

प्रियांका चोप्राच्या वाढदिवसाला निकने शेअर केला 'देसी गर्ल'चा फोटो

83 Video- रणवीरसोबत प्रॅक्टिस करताना लेकानेच मोडली संदीप पाटील यांची बॅट

Kulbhushan Jadhav यांच्यावर पाकिस्तानी अभिनेत्रीने केलं वादग्रस्त ट्वीट

'या' सहा अभिनेत्री ज्यांचे सेक्स सीन झाले होते लीक

SPECIAL REPORT: फेसबुकवर FaceApp Challengeची धूम; काय आहे चॅलेंज?

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Jul 19, 2019 03:22 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...